Jump to content

पान:अभियांत्रिकी.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) हँडशिल्ड, हेल्मेट किंवा गॉगल यांचा वापर करावा. (५) वेल्डींग सेटला बरोबर अर्थिंग केले असल्याची खात्री करावी. (६) वेल्डींग सेट व मेन स्विच यांना जोडलेली केबल जॉबपासून कमीत कमी लांबीची असावी व ती चांगली इन्शुलेट असलेली असावी. (७) वेल्डींग कामासाठी असलेली जागा ओलसर व अडगळीची नसावी. (८) बंद जागेत वेल्डींग करू नये. वेल्डींग करताना निघणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्रास होऊ नये म्हणून रंगीत पडदे वापरावेत किंवा वेल्डींग रूमच्या भिंतींना गडद रंग दिलेला असावा. (९) काम करावयाच्या सभोवती निकामी धातूचे तुकडे वा इतर वस्तू असता कामा नयेत. (१०) तेलाच्या टाक्या, ग्रीस किंवा ज्वालाग्राही पदार्थ जवळ असलेल्या ठिकाणी वेल्डींग काम करू नये, (११) बंद टाक्या, ड्रम यावर वेल्डींग करू नये, (१२) गरम जॉबला कोणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी हलवावा, गरम जॉब हलविताना चिमटा वापरा. वेल्डींग करताना काही शक्यता व त्यावरील उपाय : (१) आर्क फ्लॅश : डोळ्यांमध्ये आर्कचे तीव्र किरण गेल्यास, डोळ्यांमध्ये लाली येऊन ते जळजळ करतात. यालाच आर्क फ्लॅश म्हणतात. आर्क फ्लॅश झाल्यास थंड वा कोमट पाण्याच्या (ज्यामुळे बरे वाटेल) पट्ट्या डोळ्यावर ठेवाव्यात किंवा १/८% फेनीलीफ्रीनचे (Phenylephrine) थेंब डोळ्यांत टाकावेत. जर डोळ्यांची जळजळ जास्त त्रासदायक असेल तर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. अशा स्थितीत अधिक प्रकाशात फिरू नये. काळा चश्मा वापरावा. (२) इलेक्ट्रिक शॉक : इलेक्ट्रॉनिक मशीन, उपकरणे हाताळताना शॉक(विजेचा धक्का) लागू नये याची विशेष काळजी घ्यावी. इलेक्ट्रिक शॉक टाळण्यासाठी पुढील दक्षता घ्यावी: (१) वेल्डींग साधनांचा ज्या ठिकाणी विजेशी संबंध आहे, अशा भागांना उघड्या हातांनी स्पर्श करू नये, (२) खात्रीशीर असलेल्या केबल वापराव्या. (३) जॉबला बरोबर अर्थिंग केलेले असावे. (४) अपघात होण्याचा संभव असलेल्या ठिकाणी वेल्डींग करावयाचे असल्यास, वेल्डरने रबरी चटईवर उभे राहावे व धोका संभवल्यास त्यास त्या ठिकाणापासून दूर जाता येईल अशी व्यवस्था असावी. (५) ओलसर जमिनीवर काम करू नये. प्रात्यक्षिकाचे नाव : मेट्रिक व ब्रिटिश पद्धतीने मापन करणे. उद्देश : मटेरिअलची योग्य निवड, मापन, कटींग, हत्यारांचा योग्य वापर करणे. साहित्य व साधने : मेजरिंग टेप, हॅक्सॉ, फाईल, ड्रिल बिट, स्टिल रूल, काटकोनी गुण्या, सेंटर पंच, व्हर्निअर स्केल, बेंच व्हॉईस, सेरींग मशीन, ड्रिल मशीन इ. अपेक्षित कौशल्ये : (१) मटेरिअलची निवड करता येणे. (२) मापन समजावून घेता येणे. (३) साहित्य व साधनांचा योग्य प्रकारे वापर करता येणे. (४) अंदाजपत्रक व किंमत काढता येणे महत्त्वाचे आहे.. मापन पद्धतीचे मुख्यत्वे तीन प्रकार आहेत: ब्रिटिश (एफ.पी.एस.) पद्धती (फूट पाऊंड सेकंद या इंग्रजी शब्दांचे अद्याक्षर घेऊन बनलेले लघुरूप)