पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणखी एक गोल कर!, वीरप्पन आणखी एक गोल कर! असा प्रेक्षकांचा घोष चालला होता. कर्नाटक पोलिस, अर्थात् जिंकले. सारे प्रेक्षक खूष झाले व जयजयकार करत पांगले.
 सामन्यामध्ये कर्नाटकऐवजी काश्मीर पोलिस संघ असता आणि त्यांची चुरस सरहद्द संरक्षक पोलिस दलाशी (BSF) असती तर प्रेक्षकांनी काय केले असते हे सांगणे कठीण आहे. त्याच श्रीनगरमध्ये, त्याच बक्षी स्टेडियमवर पाकिस्तानमधील एखादा संघ खेळत असता तर काय झाले असते याची कल्पना करणे कठीण आहे म्हणण्यापेक्षा कठीण नाही म्हणणेच जास्त योग्य.
{gap}}काश्मीर तर सारा पेटलेलाच प्रदेश आहे. खेळाच्या सामन्यालाही असे टोकाचे राजकीय स्वरूप यावे हे समजण्यासारखे आहे; पण काश्मीरबाहेरदेखील सामन्यांचे वातावरण खऱ्याखुऱ्या युद्धासारखेच असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असला, की जणू काही जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा तऱ्हेने मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक घोषणांची धुमश्चक्री करून टाकतात. दूरदर्शनवर सामना पाहणारे प्रेक्षकही चेंडूच्या एका एका फेकीबरोबर उडी मारून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, जयजयकार करणे, आनंददुःख व्यक्त करणे अशा लीळा करीत असतात.
 जगातील इतर अनेक देशांत अनेक खेळांचे सामने होतात; पराकोटीच्या चुरशीने सामने खेळले जातात. फूटबॉलच्या सामन्यांच्या वेळी गुंडागर्दी करण्यात इंग्रजी प्रेक्षकांनी अलीकडे मोठे नाव कमावले आहे! दक्षिण अमेरिकेत राष्ट्रीय संघ फूटबॉलच्या सामन्यात कमी पडला तर राष्ट्रीय दुखवट्याचे वातावरण तयार होते. खेळ ही त्या देशांत गंभीरपणे घेतली जाणारी गोष्ट आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. खेळाडूंच्या सगळ्या आयुष्याची क्षणाक्षणाने उलाढाल होते; पण खेळ पाहताना उभय संघाच्या गुणवत्तेला सारेचजण दाद देतात.
 खेळांच्या प्रेक्षकांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार ग्रीक परंपरेतला. यात खेळणे, खेळात भाग घेणे महत्त्वाचे मानले जाते; जिंकण्याला फारसे महत्त्व नाही. प्रत्येक खेळाडू अधिक दूर, अधिक उंच, अधिक वेगवान या ध्येयाने उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवितो. खेळांच्या पूर्वीही आनंदोत्सवाचा जल्लोष होतो; खेळ संपतानाही मोठी भावुक विदाई केली जाते.

 खेळांची दुसरी परंपरा इटली देशातील रोमन संस्कृतीची. रोममध्ये प्रचंड क्रीडागारे असत. तेथे हजारोंनी प्रेक्षक जमत. खेळ माणूस विरूद्ध वाघ सिंहासारखे

अन्वयार्थ – दोन / १००