पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहील. शेतकऱ्यांचे एकूण कर्ज रुपये ३२ हजार कोटी. सरकारी धोरणापायी १९९६-९७ या एकाच वर्षात शेतकऱ्यांनी सोसलेले नुकसान १ लाख १३ हजार कोटी रुपये आणि तरीही, शेतीतील भाकड कर्जाची रक्कम ७,०९५ कोटी रुपये. ही आकडेवारीच शेतकऱ्यांच्या सचोटीची प्रमाणपत्रे आहेत. वित्तमंत्र्यांना दंडेली दाखविण्याची खुमखुमीच आली असेल तर सर्व बाजूंनी कोंडमारा झालेला शेतकरी उसळून उठल्याखेरीज रहाणार नाही. राज्याराज्यातील शेतकरी संघटनांनी यासंबंधीच्या सूचना शासनाकडे ज्या तत्परतेने पाठवून दिल्या आहेत, ते पाहता दुर्योधनाच्या दर्पोक्तीनंतर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र अटळ झाले याची आठवण व्हावी.

दि. ७/६/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / ६९