पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.





अनिवासींना गगन ठेंगणे


 मेरिकेतील अनिवासी भारतीय मनोज शामलन यांच्या कथेवर आधारित आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला चित्रपट The Sixth Sense हा ऑस्कर पारितोषकांच्या यादीत आहे. या चित्रपटाने अनेक उच्चांक पार केले आहेत. पटकथेसाठी डिस्ने कंपनीने शामलन याला २५ लाख डॉलर्स (रुपये १० कोटींच्या वर) दिले. एवढेच नव्हे तर त्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्याच्यावर सोपविली. प्रकाशित होताच चित्रपटाने एक हजार कोटी रुपयांचा गल्ला कमविला. मनोज शामलन, वय वर्षे २९, भारतातून अमेरिकेत जाऊन राहिलेल्या डॉक्टर जोडप्याचा मुलगा; शाळाकॉलेजांत सतत पहिल्या क्रमांकावर राहिलेला. त्याने यशस्वी डॉक्टर व्हावे असे त्याच्या आईवडिलांचे स्वप्न. पारंपरिक शिक्षणक्रम सोडून त्याने एकदम सिनेमा या विषयावरील अभ्यासक्रमच निवडला तेव्हा आईवडील दुःखी झाले, चिंताग्रस्त झाले आणि आज, आपण स्वप्न तर पहात नाही ना असा त्यांना प्रश्न पडत आहे. अमेरिकेतील प्रत्येक अनिवासी भारतीय मनोजच्या चित्रपटास ऑस्कर पारितोषिक मिळावे यासाठी मनोमन प्रार्थना करीत आहे.

 अमेरिकेतील प्रत्येक भारतीयाच्या मनात आपल्या बुद्धीने, कर्तृत्वाने वा प्रतिभेने सर्व अमेरिका जिंकावी असे एक स्वप्न उराशी बाळगून जतन केलेले असते. त्या स्वप्नाचे मनोज शामलन एक प्रतीक बनला आहे.
 हे काही एकमेव उदाहरण नाही. माझा स्वतःचा पुतण्या अमोल जोशी याने इंटरनेटला बोलते केले आहे. (अधिक माहितीसाठी पाहाwww.BVocal.com). गणकयंत्राच्या क्षेत्रात बिल गेट्स् नंतरची ही सर्वात मोठी भरारी मानली जाते. आपला प्रकल्प त्याने पुढे मांडला तेव्हा जागच्या जागी त्याला ४.५० कोटी डॉलर्सचे भांडवल लोकांनी उभे करून दिले. कालच या वेबसाइटवरून मी

अन्वयार्थ – दोन / ४४