पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 साऱ्या देशांत कडव्या मुल्लांचा प्रभाव पहिल्यापासूनच मोठा जबरदस्त. त्यात अफगाणिस्तानमध्ये रशियन आक्रमणालाही थोपवून मागे सारणाऱ्या तालिबानच्या शौर्यगाथांनी सगळे वातावरण भारून गेले आहे. तालिबान जे जे करतील ते योग्य आणि श्रेष्ठ. तालिबानने बायकांना बुरखा घेण्याची सक्ती केली, त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने घातली. मग काय? आधीच उल्हास, त्यातून फाल्गुन मास!
 कथा घडली ती लाहोरच्या विद्यापीठात. एक दिवस अचानक अस्सल अफगाणी ठगांचे सलवारखमीस पेहेनलेले आणि दाढी वाढविलेले जामियाँ-एइस्लामचे कार्यकर्ते जिकडे पहावे तिकडे दिसू लागले. कुलगुरू राहिले बाजूला; विद्यापीठ प्रशासनालाही कोणी विचारे ना. जामियाँ-ए-इस्लामचे कार्यकर्ते ठरवतील तोच नियम आणि तोच कायदा असे झाले. सर्व धर्ममार्तंडांचे मुख्य शौर्य काय ते बायकांवर बंधने घालण्यातच दिसते. लाहोरमध्येही तेच घडले. जामियाँए-इस्लामने फर्मान काढले की, विद्यापीठातील मुलीनी बुरखा घेतला पाहिजे, एवढेच नव्हे तर.केससद्धा मोकळे सोडता कामा नयेत. विद्यापीठाच्या आवारात तीस सार्वजनिक टेलिफोन केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर पाटी लागली - विद्यार्थिनींना टेलिफोन केंद्र वापरायची बंदी आहे. (जामियाँ-ए-इस्लामच्या हुकुमावरून) टेलिफोन केंद्र चालविणाऱ्या कोणाचीही हा हुकूम मोडण्याची हिंमत नव्हती. एकाने प्रयत्न केला. त्याच रात्री त्याच्या केंद्राची मोडतोड, नासधूस झाली. त्यानंतर कोणाचीच आपल्या केंद्रावर मुलींना प्रवेश देण्याची हिंमत झाली नाही. विद्यापीठाच्या आवारात कोणाही विद्यार्थिनीने पुरुष विद्यार्थ्याशी बोलता कामा नये असेही फर्मान सुटले. जामियाँ-ए-इस्लामचे कार्यकर्ते हातात काठ्या घेऊन फिरू लागले. कोणा विद्यार्थिनीने केस मोकळे सोडलेले आहेत असे दिसले, की जामियाँ-ए-इस्लामचे वीर कात्रीने ते कापून विद्रूप करू लागले. हे दाढीवाले कार्यकर्ते दिसले, की मुली घाबरून जवळच्या खोलीचा आसरा घेऊन लपून राहू लागल्या.
 आणि एक दिवस सशालाही आपल्यावरच्या जुलुमजबरदस्तीचा वीट आला. झाले असे :-

 एक विद्यार्थिनी एका पुरुष विद्यार्थ्यांकडून गणितातील एका प्रश्नाची अडचण सोडवून घेत होती. जामियाँ-ए-इस्लामच्या कार्यकत्यांनी ते पाहिले आणि त्या विद्यार्थ्याला त्यांनी बेदम बदडले. कितीएक विद्यार्थिनींचे केस कापले तरी चीड न आलेल्या विद्यार्थिनी या प्रकरणाने उसळून उठल्या. विद्यापीठाच्या पूर्ण आवारात

अन्वयार्थ – दोन / ४१