पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/25

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आईचा मनोदय होता.
 'गरीब बिचारे, फक्त १ रुपयामध्ये दररोज एक तास घरी येऊन शिकवणी करणार आहेत आणि बाळबरोबर तूही बसलास तर आपल्याला ती शिकवणी काही फार महाग नाही.'
 शिक्षक आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षक म्हणजे माझ्या लहानपणी सर्वांच्याच आदराचा आणि करुणेचा विषय असायचा. त्यानंतर १० वर्षांनी मुंबईला असताना प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांकरिता प्राचार्य दोन्दे यांनी दीर्घ काळ उपवास केला होता. तोपर्यंत तरी, महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षक ही सालस सज्जनांची जात होती. कारकुनाची नोकरी मिळाली तर शिक्षक मोठ्या आनंदाने नोकरी सोडून जायला तयार असत; पण अशी संधी काही थोड्या भाग्यवंतांनाच लाभायची.सेवा आणि ज्ञानदान या पलीकडे कोणताही अधिकार नसलेली अशी ही मंडळी.

 बेळगावच्या आठवणीतील माझा मोठा भाऊ आता बाळासाहेब झाला आहे. दिल्लीजवळ त्याच्या मुलानेही एक कारखाना काढला आहे. कारखाना काढणे आणि चालविणे ही सगळ्या देशात मोठी कठीण कामगिरी झाली आहे. उत्तरेत तर आपल्यापेक्षा अधिक, कारखाना चालविणाऱ्यांना आसपासच्या गुंडांचा त्रास, युनियनच्या पुढाऱ्यांचा त्रास. कोणत्याही गोष्टीसाठी काहीही परवाना मिळवायचा झाला तर संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन किंवा एखाद्या नेत्याकडे जाऊन काही नाकदुऱ्या काढाव्या लागतात; त्यासाठी त्यांना संतुष्ट करावे लागते. एकूणच मोठा मनस्तापाचा मामला. नको ती कारखानदारी आणि नको या उर्मट सत्ताधाऱ्यांपुढे वाकणे असे सगळ्यांना होऊन जाते.
 बाळासाहेबांची सून जवळच्याच एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. फरिदाबादला त्यांच्या घरी मुक्कामाला गेलो म्हणजे आमच्या सूनबाईंची शाळेत निघतानाची तयारी अन् जामानिमा पाहून मी चेष्टाही करत असतो, शाळा आहे का शिक्षिकांची सौंदर्यस्पर्धा आहे? अलीकडे मी तेथे उतरलो तेव्हा एक चिंतेचा विषय निघाला होता. कारखान्यांच्या आसपासची काही मंडळी खोडसाळपणे कारखान्यांत घुसून काही उपद्व्याप करीत होती. आमच्या कुटुंबीय मंडळीत मी असलो, की माझ्याकडे सगळेचजण एका वेगळ्याच दृष्टीने पहातात. सर्व संसारतापांतून मुक्त झालेला भाग्यवान अशी काहीशी त्यांची दृष्टी असते. गुंडांच्या उपद्रवाचा आणि बँकेच्या दिरंगाईचा प्रश्न आमचे बंधुराज कसा काय हाताळणार याबद्दल मला कुतुहल वाटतच होते. माझ्या पुतण्यानेच उत्तर पुरविले, आता

अन्वयार्थ – दोन / २७