पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गव्हर्नर असताना त्यांनी हाताळलेल्या काही प्रकरणांबाबत संशय आणि आरोप यांचे वादळ उठले. मनुष्य एकूण काही निष्कलंक चारित्र्याचा पुतळा नाही अशी त्यांची प्रतिमा.
 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी नेहमीच अतिविशिष्ट व्यक्ती असते. क्लिंटन यांची पत्नी हिलरी स्वतः विद्यापीठात आणि कार्यक्षेत्रांत गाजलेली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष आपल्या पत्नीकडे अनेक कामांची स्वतंत्र जबाबदारी सोपवितात. तिला अमेरिकेच्या पहिल्या महिला या पलीकडे कॅबिनेट दर्जाचे स्थान आहे. पुढेमागे सौ. हिलरी स्वतःच अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा बनू शकतील काय याबद्दल चर्चा होत असते.
 रुबाबदार व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर खेळणारे थोडे मिष्किल हसू आणि डोळ्यात जेम्स बॉण्डच्या पद्धतीची घायाळ करणारी नजर. टेलिव्हिजनच्या या युगात क्लिंटन यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या रूपानेसुद्धा साध्य झाली असती.
 मध्यंतरी मोनिका लेवेन्स्कीचे प्रकरण निघाले. स्वतः क्लिंटन यांना एका लहान मुलीशी केलेल्या चाळ्यांचा कबुलीजबाब द्यावा लागला. मी जे केले ते चूक होते असे जगासमोर उभे राहून सांगावे लागले. पण तरीही, त्यांच्याविरुद्धचा बडतर्फीचा ठराव फेटाळला गेला, एवढेच नव्हे तर, या सगळ्या काळात त्यांच्या अश्लील चाळ्यांची तपशीलवार वर्णने छापली जात असताना त्यांच्या लोकप्रियतेचा निर्देशांक वाढत राहिला. हे कसे काय झाले? मोठे कोडे आहे!
 एका बाजूस आपल्या व्यक्तिगत सहाय्यकांशी अभद्र चाळे करणारा राष्ट्रपती इराकच्या सद्दामची खोड मोडण्याकरिता त्या देशावर क्षेपणास्त्रांचा प्रचंड मारा करण्याचा आदेश देतो आणि ओसामा बिन लादेन यांच्या हस्तकांनी काही घातपाती स्फोट घडवून आणल्यावर त्यांच्या अतिरेकी छावण्यांवर आधुनिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचाही निर्णय देतो.

 क्लिंटन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. आयर्लण्डमधील कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधील रक्तलांछित संघर्ष वर्षानुवर्षे चालला होता. इस्रायल आणि अरब यांच्यातील खाईतर वर्षानुवर्षे पेटत राहिलेली. या प्रकरणांत क्लिंटन यांचे वेगळेच रूप प्रकट झाले. दोन्ही प्रकरणांत उभय पक्षांच्या नेत्यांबरोबर बसून काही एक समझोत्याचा आराखडा त्यांनी तयार केला आणि तो अमलात आणण्याकरिता अमेरिकेची सर्व ताकद कामास लावली. इस्रायल आणि अमेरिका यांचे फार जुने घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिकेतील ज्यू नागरिकांचा अमेरिकन राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यावरही मात करून क्लिंटन यांनी इस्रायलच्या

अन्वयार्थ – दोन / २१