पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/13

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.






व्यापार करा, युद्ध नको


 मेरिकेचे राष्ट्रपती भारतात येत आहेत. पहिल्या कार्यक्रमाप्रमाणे ते पाकिस्तानला जाणारच नव्हते, त्यामुळे भारतात एक मोठी विचित्र समाधानाची भावना होती. जगातील सर्वांत मोठा सत्ताधारी भारताला भेट देतो आणि पाकिस्तानला देत नाही याचा अर्थ भारताच्या धोरणांची प्रशंसा आणि पाकिस्तानच्या लष्करी सत्तेची आणि आतंकवादी कारवायांची जाहीर निर्भर्त्सना असा लावला जात होता.
 अगदी शेवटच्या क्षणी आपल्या कार्यक्रमात फेरबदल करून प्रेसिडेंट क्लिंटन यांनी पाकिस्तानमध्येही काही काळ थांबण्याचा आपला इरादा जाहिर केला. साहजिकच, हिंदुस्थानातील नेतेमंडळीच्या चेहेऱ्यावर अवकळा आली. भेट किती का छोटी असेना, त्यामुळे पाकिस्तानी कारवायांना प्रोत्साहन मिळेल अशी हाकाटी दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी सुरू केली. याउलट, क्लिंटन यांचा पाकिस्तानभेटीचा निर्णय म्हणजे भारताला मिळालेला एक मोठा झटका आहे असा हैदोस पाकिस्तानी करू लागले.

 पंडित नेहरूंच्या काळापासून अमेरिकेचे माप पाकिस्तानकडे झुकते राहिले आहे. पंडितजींचे धोरण तटस्थतावादी खरे, पण त्यात एक झुकाव सोव्हियेट युनियनच्या प्रभावाखालील समाजवादी राष्ट्रांच्या गटाकडे होता. पाकिस्तान उघड उघडच आग्नेय आशियाच्या संरक्षण करारात (SEATO) सामील झाल्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांची विशेष दोस्ती होती. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांनी उघडउघड पाकिस्तानच्या बाजूने पक्षपाताचे धोरण स्वीकारले. अमेरिकेचे चीनबरोबरचे संबंध सुधारू लागले यातही अमेरिकेचा पाकिस्तानकडील कल स्पष्ट होता. रशियाचे सर्वेसर्वा ब्रेझनेव्ह यांनी अफगाणिस्तानमध्ये फौजा घुसविल्यापासून तर अमेरिका-पाकिस्तान

अन्वयार्थ – दोन / १५