पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्पर्धा; आमची समुद्रपर्यटनास विरोध करणारी परंपरागत संस्कृतीच भली अशी भूमिका घेऊन जागतिक व्यापार संस्था भरवीत असलेल्या व्यापार ऑलिम्पिकमध्ये भागच घ्यायचा नाही असे म्हटले तर नुकसान जगाचे नाही, ऑलिम्पिकचेही नाही. अशा भूमिकेमुळे गुणवत्तेच्या परिपोषासाठी कसोशीने तपस्या करण्याची संस्कृती मागे पडेल आणि क्रीडाक्षेत्राप्रमाणेच व्यापारक्षेत्रातही आम्ही सदाचे नेबळे बनून जाऊ.

दि. २९/९/२०००
■ ■

अन्वयार्थ – दोन / १०२