पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/300

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भडकाविणाऱ्या नेत्यांना 'हृदय सम्राट' आणि 'मसिहा' मानले जाते. जातीयवाद संपून अर्थवादाकडे वहण्याऐवजी इतिहासाचा सूड प्रत्युत्तरादाखल घेणारा जातीयवाद समर्थनीय आहे असे भलेभले मांडू लागले आहेत. नोकऱ्या, शैक्षणिक संस्था, विद्यापीठांची नावे असे वेगवेगळे मोर्चे टोळीवाले धडाधड उघडत आहेत. 'सामाजिक न्याया'ची गोंडस भाषा जिभेवर खेळवत आहेत.
 कुणाला समजो किंवा ना समजो हिंदुस्थान आणि रुआंडा यात फारसे अंतर नाही. रक्तपात करण्यात आम्ही आफ्रिकी टोळ्यांपेक्षा जराही मागे नाही याची साक्ष गेल्या ५० वर्षांचा इतिहासच देतो. हिंदुस्थानात रुआंडाची पुनरावृत्ती कोणत्याही क्षणी होऊ शकते.

(१० ऑगस्ट १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३०१