पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/295

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दारूगोळा २-३ आठवडेसुद्धा पुरणार नाही, हे पक्के ठाऊक असतानाही ते शस्त्रे खरीदतात. बाहेरच्या हल्याला तोंड देण्यासाठी नाही, देशातील असंतोष चिरडण्यासाठी.
 शस्त्रास्त्रांचाही खुला बाजार होऊ द्या
 माणसांच्या काही दुर्दैवी आणि घातक प्रवृत्ती असतील, आहेत; पण त्या संपवण्यासाठी पुन्हा एकदा कोणी ढ्ढचार्य नियंत्रणासाठी बसवणे अधिक घातक आहे. खुल्या बाजारपेठेतील मागणी पुरवठ्याच्या ताकदीला मुक्त वाव दिल्यानेच ते कम अधिक चांगले होईल. शस्त्रांचा पुरवठा अमक्या राष्ट्राला करू, अमक्या राष्ट्राला करणार नाही. असा सरकारी हस्तक्षेप शस्त्रांच्या बाजारपेठेत असल्याने गरीब राष्ट्र विनाकारण शस्त्रास्त्रांवर पैसे उधळतात. डंकेलप्रमाणे दुसरा कोणी शस्त्र बाजारातील सरकारी हस्तक्षेप आटोक्यात आणेल तर डॉ. महबूब अल हक यांनी निदान केलेल्या रोगावर खरीखुरी उपयायोजना होईल.

(२४ जून १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २९६