पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/291

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






मरणात खरोखर जग जगते


 कोण्याही पाकिस्तानाबद्दल हिंदुस्थानातील लोकांना आदर वाटावा असे क्वचित घडते. खेळ, कला अशी क्षेत्रे सोडली तर पाकिस्तानी नागरिकाला हिंदुस्थानात वाहवा मिळणे कठीण आहे.
 याला महत्त्वाचा अपवाद डॉ. महबूब अल हक यांचा. डॉ. महबूब ऑक्सफर्ड आणि केंब्रिजचे पदवीधर, जागतिक बँकेमध्ये उच्चाधिकारावर काम केलेले. एकेकाळी पाकिस्तानी नियोजन मंडळावर आणि काही काळ अध्यक्ष, झियांचे वित्तमंत्री म्हणून काम केलेले. मोठ्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आणि आपल्या मतांचे प्रभावी प्रतिपादन करणारे अशा या विरळा पाकिस्तान्यास आंतरराष्ट्रीय समाजात मोठी मान्यता आहे.
 मानव विकास निर्देशांक
 डॉक्टर साहेबांचा एक मोठा ध्यास आहे. राष्ट्रीय उत्पादनाच्या आकड्यांवर देशाचा विकास अजमावण्याऐवजी एक नवा हिशेब बसवण्यात यावा, मानवाचा खराखुरा विकास दाखवेल असा निर्देशांक तयार करावा, त्यात मनुष्याच्या प्रगतीला पोषक नसलेले उत्पादन मुळात धरूच नये, असा डॉक्टरसाहेबांचा आग्रह आहे. छोटी दरिद्री राष्ट्र सैन्यावर आणि शस्त्रास्त्रांवर अफाट खर्च करतात, जनतेला धड खायला नाही, शिक्षणाची सोय नाही, पाणी नाही, वीज नाही; पण सुविधांकरिता पैसे खर्च करण्याऐवजी त्यांची सरकारे अब्जावधी रुपये तोफा, रणगाडे, विमाने शस्त्रास्त्रे खरीदण्यावर उधळतात याला डॉक्टरसाहेबांचा मोठा विरोध आहे.

 हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन देशांच्या शस्त्रास्त्रांच्या खर्चावर डॉक्टरसाहेबांचा विशेष रोष आहे. भारत या प्रदेशातील सर्वात मोठे राष्ट्र असल्याने त्याने एकतर्फी शस्त्रकपात सुरू करावी, इतर देशांनी विशेषतः पाकिस्तानने

अन्वयार्थ - एक / २९२