पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/282

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भेटीत जातात ते मायदेशी आपली प्रतिमा उंचावावी याकरिता. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांनी हस्तांदोलन करतानाचे चित्रण देशातील वर्तमानपत्रात आणि टेलिव्हिजनवर झळकले म्हणजे आपली लोकप्रियता वाढेल आणि निवडणुकात दोन मत जास्त मिळतील अशा आशेने टिनपाट राष्ट्रांचे नेते अमेरिकेत मिरवायला धडपडत असतात.
 मराठीतील प्रख्यात विनोदी लेखक चि.वि. जोशी यांनी चंदनवाड संस्थानातील त्यांच्या भेटीचे मोठे बहारदार वर्णय 'चिमणराव स्टेट गेस्ट' या कथेत केले आहे. संस्थानिकांच्या पंक्तीला बसायचा मान अनेकांना मिळे. पंगतीत वर्गवारी असे. खाशांच्या पंक्तीला दोन दोन पक्वान्ने, साजूक तूप, ते वाढायला स्वतः राणीसाहेब, दुसऱ्या पंक्तीला पुरणपोळी, वाढप आचाऱ्यांकडे. तिसऱ्या वर्गाला पुरी आणि चौथ्या वर्गाला चपाती अशा पंक्तीप्रपंचाचे मोठे गंमतीदार वर्णन त्यात आहे.
 सुलतानांच्या कतारी
 भेट देणाऱ्या पाहुण्याची स्थिती चंदनवाड संस्थानाच्या शाही पाहुण्यांसारखीच असते. आलेल्या पाहुण्याला त्याच्या त्याच्या वर्गाप्रमाणे वागणूक मिळते. आपापल्या देशात सम्राटाप्रमाणे येथे रांगा लावून उभे राहतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विमानतळावर स्वागत करण्यासाठी कधीच जात नाहीत. राष्ट्रपतीभवन श्वेतनिकेतनजवळ असलेल्या हेलिकॉप्टरच्या धावपट्टीवर राष्ट्रपती पाहुण्यांच्या स्वागतासाठी आले, की त्यांचा मोठा मान झाला समजायचे. राष्ट्रपतींशी चर्चा किती वेळ चालली हे दुसरे पाहुण्यांच्या स्वागतासाठी आले, की त्यांचा मोठा मान झाला समजायचे. राष्ट्रपतींशी चर्चा किती वेळ चालली हे दुसरे पाहुण्यांच्या प्रतिष्ठेच गमक. राष्ट्रपती भावनात पाहुण्यांकरिता खास मेजवानी झाली काय? ती किती जंगी होती? ही पाहुण्यांच्या वर्गवारांची आणखी एक फूटपट्टी. अमेरिकन प्रतिनिधी सभागृहासमोर भाषण करायला मिळणे हा विशेष मान समजला जातो. काही खास प्रसंगाने किंवा उभयराष्ट्रांत काही महत्त्वाच्या समस्या उभ्या असतील तरच असे अभिभाषण ठरवले जाते.
 हम भी कुछ कम नही

 पंतप्रधानांचा अमेरिका दौरा ठरला, त्याबरोबर अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या बैठकीसमोर अभिभाषण करण्याकरिता त्यांना निमंत्रण यावे यासाठी विदेश मंत्रालयाची धडपड सुरू झाली. कारण समजण्यासारखे आहे. आपणास निमंत्रण मिळावे अशी कोणत्याही नेत्याची, अगदी टिनपाट देशाचा का असेना, तहान

अन्वयार्थ - एक / २८३