पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/275

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टोळ्या देशभर थैमान घालत आहेत. कारखाने उघडण्यासाठी परवाना व्यवस्था असणे गैर, तसेच कारखाने बंद करण्यासाठीदेखील परवाना व्यवस्था चुकीचीच. जे जे म्हणून खुल्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे., अनैसर्गिक आहे ते केवळ कायद्याच्या आणि सरकारी बडग्याच्या जोरावर घडवण्याचा प्रयत्न केला म्हणजे निष्पती होत काळ्या बाजाराची; तस्करांची; समांतर अर्थव्यवस्थेची आणि गुंडाच्या टोळीची. अजयची आत्महत्या आणि खटावांची हत्या याचा खरा निष्कर्ष असा, की उद्योजकांना निर्गम स्वातंत्र्य देणे आता अत्यंत तातडीचे झाले आहे; पण महाराष्ट्र शासन करील नेमके उलटे. निर्बंध कमी करण्याऐवजी गिरणीमालकांना जमिनी विकण्याची बंदीच करील. कारणे दुधखुळ्या पोरांनाही आता समजू लागले आहे.

(२७ मे १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / २७६