पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
राजकीय इतिहासाचे चित्रण

ग. प्र. प्रधान

 १९९८ सालचा 'अक्षर प्रतिष्ठान' चा दिवाळी अंक वाचीत असताना 'हरवलेला देश' या शीर्षकाखाली पुढील मजकूर होता. “हरवलेला देश' या अफगाणिस्थानच्या पार्श्वभूमीवरील इस्लामविरुद्ध कम्युनिझमच्या संघर्ष रंगवणाऱ्या व १९५० ते १९९८ या कालखंडातील अफगाण जनजीवनाचे दर्शन घडविणाऱ्या कादंबरीचे एक प्रकरण."
 मी कुतूहलाने ते प्रकरण वाचू लागलो आणि मला ते अतिशय आवडले. त्याचे लेखक लक्ष्मीकांत देशमुख हे मला परिचित नव्हते. परंतु या लेखकाला आपला अभिप्राय आणि अपेक्षा कळवाव्यात असे मला वाटले आणि मी त्यांना 'अक्षर प्रतिष्ठान'च्या परभणीच्या पत्त्यावर पत्र लिहिले काही दिवसांनी लक्ष्मीकांत देशमुख माझ्या घरी आले त्यावेळी मी चकित झालो. ते एक उच्चपदस्थ शासकीय अधिकारी आहेत हे कळल्यावर मला अधिकच विस्मय वाटला. मी लक्ष्मीकांत देशमुखांना म्हणालो, "आपण १९५० पासून १९९८ पर्यंतच्या अफगाणिस्थानचे चित्र रेखाटले. आता उपसंहार लिहिणार का?" त्यावर ते म्हणाले, “मी समग्र इतिहास लिहीत नाही. इतिहासातील एका कालखंडाचे चित्रण करणारी कादंबरी लिहिली आहे. कादंबरी आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आपण कादंबरी वाचून योग्य वाटल्यास प्रस्तावना लिहावी." कादंबरीस प्रस्तावना लिहिणे उचित होईल की नाही अशा मन:स्थितीत मी होतो. परंतु ती वाचल्यावर मला कादंबरी तिच्या गुणावगुणांसह आवडली आणि लक्ष्मीकांत देशमुखांचा शब्द मोडवेना. त्यामुळे मी हे प्रास्ताविक लिहीत आहे.

कादंबरीची सुरुवात होते ती अन्वर या तरुणाच्या कुटुंबाच्या चित्रणापासून. दुर्राणी वंशातील परमान गावचे हे अफगाण जमीनदाराचे कुटुंब. अन्वरचे वडील अब्बाजान यांची कुटुंबावर मायेची सावली आणि खानदानी घराण्यातला दबदबा. धर्मनिष्ठा आणि अल्लावरील श्रद्धा हे त्यांच्या जीवनाचे आधार. एक मुलगा सईद, शेतमजुरांना जरबेत ठेवून बागाईत शेती फुलवणारा. थोरला मुलगा 'वीश झलमायन'

१८४ □ अन्वयार्थ