पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मानसिकता बदलणे आवश्यक

रताच्या वैशिष्ट्यपूर्ण समाजरचनेचा विपरीत परिणाम उद्योग क्षेत्रावर कसा झाला आहे,याची पार्श्वभूमी गेल्या लेखात आपण कासव व गरुड या उदाहरणांवरून समजावून घेतली आहे. स्वातंत्र्यानंतर सरकारने स्वीकारलेलं आर्थिक धोरण हेदेखील साचेबध्द पोथीनिष्ठ असंच होतं. जाचक कायदे, जटिल कररचना, सरकारचं नको इतकं नियंत्रण व इन्स्पेक्टर राज हे या धोरणाचे वैशिष्ट्य होतं. उत्पादनवाढ,तंत्रज्ञान विकास व निर्यातीत वाढ यांना प्रोत्साहन देण्यापेक्षा उद्योगांना नियम व अटींच्या जंजाळात अडकवून ठेवण्यात धन्यता मानली जात असे. समाजहिताच्या नावाखाली बऱ्याच उद्योगांचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.सरकारी नियंत्रण म्हणजेच विकास अशी विकासाची जणू नवी व्याख्या करण्यात आली. जुन्या काळात व्यवसायांवर आधारित जातिव्यवस्थेमुळे स्पर्धा संपुष्टात आली होती, तर नव्या काळात 'लायसेन्स राज'मुळे! म्हणजेच आपल्या समाज रचनेप्रमाणेच स्वातंत्र्य व व्यक्तिविकास यापेक्षा

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/८३