पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/९१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


व्यक्तिकेंद्रित राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, संस्थेच्या हितापेक्षा व्यक्तीचंं हित महत्त्वाचे मानणंं आदी प्रकार आपल्या औद्योगिक व इतर संस्थांमध्ये सहज घडत असतात, त्यात काही चुकीचंं आहे असं वाटतही नाही. हे सर्व समाजरचनेच्या प्रभावामुळेच होत आहे. त्यामुळे बुध्दिमत्ता, कर्तृत्व आदी गुण वाया जात आहेत.
 अशा परिस्थितीत समाज रचनेचा परिणाम उद्योगांवर होऊ न देणं हे व्यवस्थापकांसमोरचंं खडतर आव्हान आहे. संपूर्ण समाज बदलणं व्यवस्थापकाच्या हातात नसतं.तो समाजसुधारक असेलच असं नाही. तशी अपेक्षाही त्याच्याकडून केेलाी जाऊ शकत नाही. शिवाय तो स्वतःच या समाजरचनेचा बळी असण्याची शक्यता अधिक असतेे.अशा वेळी परिवर्तनाची सुरुवात त्याला स्वतःपासून करावी लागते आणि हेच कार्य कठीण असतंं. मात्र ते केल्याशिवाय आधुनिक काळात भारतीय उद्योगांचा पाडाव लागणं कठीण आहे.

 त्यामुळे समाजरचनेचा विपरीत परिणाम उद्योगांवर होऊ नये, म्हणून काय करता येईल याबाबत व्यवस्थापनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. कित्येक संस्थांमध्ये ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून त्याला यशही येत आहे. भारतीय उद्योगाला गरुडाचे पंख आणि चोच मिळवून देण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन काय उपाययोजना करीत आहे याचा विचार पुढच्या स्वतंत्र लेखात करू.

समाज रचनेचा विपरित परिणाम/८२