पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ब्याडगी मिरचीचे असेल तर दीड चमचा पुरेल आणि जगात सर्वात तिखट समजल्या जाणाऱ्या आसामी मिरचीचे असेल तर अर्धा चमचाही जास्त होईल.पण इतकी सविस्तर माहिती पुस्तकात नसते, त्यामुळे अनेेकदा अंंदाज चुकतो.
 घरातील डबल ग्रॅॅज्युुएट सुनेने स्वयंंपाकाची आधुनिक सूत्रे वापरून पुस्तकाबरहुकूम केलेली पुरणपोळी ‘फिकी' पडते. मात्र तिच्या निरक्षर सासूने चुलीवर केलेली पुरणपोळा अशी फक्कड होते की, पंगत रंगतदार झालीच पाहिजे.
 असं का होतं, तर कोणताही पदार्थ करताना, केवळ थिअरी’ माहीत असून उपयोग होत नाही. तर कित्येक बाबीची ‘ऑफ द रेकॉर्ड’ माहिती आणि ‘प्रॅॅक्टिकल नॉलेज’ असावं लागतं. ते पुस्तकातून मिळत नाही. ही ऑफ द रेकॉर्ड माहिती जितका जास्त व अचूक तितका स्वयंंपाक चांगला असं सूत्र असतं. ती मिळविण्याचे दोनच मार्ग असतात. एक अनुभवांतून शहाणे होणंं व दोन, अनुभवी व्यक्तींकडून माहिती मिळविणं,यापैकी पहिला मार्ग वेळखाऊ व कष्टसाध्य आहे.मात्र माहिती देणारी व्यक्ती विश्वासार्ह असेल तर दुसरा मार्ग सोपा व जलद आहे.
 वरील उदाहरण ‘चमचेगिरी’ या कल्पनेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडते. (‘चमचा ' हा स्वयंपाक आणि संस्था यांच्यातील ‘कॉमन फॅक्टर' आहे.)
 संस्था चांगली चालविणं हे पाकसिध्दी चांगली करण्यासारखीच आहे.या‘स्वयंपाकाची साधनं कोणती, तर मुख्यत: संस्थेचे कर्मचारी व इतर संबंधित. संस्थेच्या यशासाठ या ‘साधनां’चे केवळ रेकॉर्ड माहीत असून चालणार नाही. तर काही प्रमाणात व काही बाबतीत त्यांची ऑफ द रेकॉर्ड माहिती असणेही व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक,कित्येकदा अनिवार्य ठरते आणि इथेच चमचा व चमचेगिरी यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
 संस्थेच्या कर्मचाच्यांचं वय,शैक्षणिक पात्रता, राहण्याचंं ठिकाण,त्यांचा वक्तशीरपणा, कार्यपध्दती यांची माहिती रेकॉर्डवरून मिळू शकते.तर त्याचा स्वभाव,संस्थेत येण्याचा उद्देश, प्रामाणिकपणा, निष्ठा, संस्थेच्या धोरणांबाबतचं मत. वरिष्ठांबाबतचंं मत यांची माहिती रेकॉर्डवरून मिळू शकत नाही,पण ती मिळवणंं आवश्यक असते. कारण त्याशिवाय त्याचा उपयोग कसा, कुठे व केव्हा करून घ्यायचा याचा आडाखा बांधता येत नाही. ही माहिती उघडपणे विचारावी तर सत्य समजण्याची शक्यता असतेे.म्हणूून कित्येकदा व्यवस्थापकाकडूनच गुप्तपणे माहिती मिळविण्यासाठी चमचेगिरीला उत्तेजन दिलं जातं.

 आणखी एक उदाहरण पाहा. एका घरात दोन सुना आहेत. एक नवीनच आलेली,तर एक काहीशी अनुभवी. नव्या सुनेने एक पदार्थ करायला घेतला व त्याच्या

व्यवस्थापन ‘चमचेगिरी'/७४