पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महिलांच्या यशाचे रहस्य

दयोग क्षेत्रातील महिला व्यवस्थापकांना जाणवणाच्या अडचणी आणि त्या स्वबळावर

दूर करून यशाच्या मार्गावरून त्यांची वाटचाल, या संबंधी मागच्या लेखात आपण काही मुद्दे जाणून घेतले आहेत. मी स्वतः तसेच इतर अनेक अभ्यासकांनी अनेक यशस्वी महिला व्यवस्थापकांची जीवनपध्दती व कार्यशैली यांचा सविस्तर अभ्यास केला आहे. त्यावरून पुरुष व्यवस्थापकांच्या तुलनेत महिलांची कार्यक्षमता, निर्णयशक्ती, व्यावसायिक चातुर्य व विजिगिषु वृत्ती कुठेही कमी पडत नाही असं दिसून आले आहे. काहीसा धोका पत्करण्याचं धाडस व व्यवहारी चातुर्य यांच्या साहाय्याने महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच पराक्रम गाजवू शकतात व या दोन बाबींची आवश्यकता केवळ त्यांनाच नव्हे, तर पुरुष व्यवस्थापकांनाही असते. धोका पत्करणं व युक्तिबाजपणा याखेरीज परुष व स्त्री यांच्यात आपण समजतो तितका गुणात्मक फरक असत नाही असं अभ्यासावरून दिसून येतं.
 रॉर्बट टाऊनसेंड या अभ्यासकाने त्याच्या ‘अप द ऑर्गनायझेशन' नामक पुस्तकात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असणाच्या महिला व्यवस्थापकांना प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात काही नेमक्या व व्यवहार्य सूचना केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
 प्रश्न : कार्यालयात माझ्या बाजूच्याच खुर्चीवर बसणाच्या आणि मी करते तेच काम माझ्या इतक्याच कुशलतेने करणाच्या माझ्या पुरुष सहकाऱ्याला माझ्यापेक्षा ५०

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ ६९