पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाचं आहे.‘ससा व कासव’ ही गोष्ट फारक उद्बोधक ठरावी.
 शर्यत सुरू झाल्यानंतर ससा सुरुवातीला कासवाच्या खूपच पुढे गेला. तरीही सशाचा एका दुर्गुणाचा फायदा उठवून कासव शर्यत जिंकले,कारण ते हळूहळू का असेना पण पळत राहिलं.ससा बराच पुढे गेला आहे,आता आपण शर्यत जिंकू शकत नाही असा विचार कासवाने केला असता व शर्यत सोडून दिली असती, तर, ससा वाटेत झोपूनही कासव विजयी झालं नसतं. महिला व्यवस्थापकांनी या गोष्टीचा आदर्श ठेवावयास हरकत नाही. तसं पाहू गेल्यास पुरुष व महिला यांच्या स्वभावातही ससा आणि कासव हाच फरक आहे. परंपरेने पुरुषाला जास्त अधिकार दिले आहेत, त्या गुर्मीत तो बेसावध राहण्याची शक्यता असते. याउलट संस्कारांमुळे महिलाही अधिक सहनशील, सावध,सोशिक व योजनाबध्द काम करणारी असते. या स्वभाव वैशिष्ट्यांचा फायदा तिला मिळू शकतो.अर्थात प्रत्येक वेळी असंच होईल असं सांगता येणार नाही. कारण ‘ससा आणि कासव' ही गोष्ट आता सशांनाही ठाऊक झाली आहे.तेव्हा महत्त्वाची बाब अशी की, परिस्थितीशी मिळवून घेणं आणि कोणत्याही परिस्थितीत स्पर्धेतून माघार न घेणं,हे महिला व्यवस्थापकासाठी आवश्यक आहे.
नकारात्मकता झटकून टाका:
 एकदा आपण खेळात भाग घेतलाच आहात तर तो मन लावून, गंभीरपणे व खंबीरपणे खेळा.खेळ म्हटला यश अपयश यांचा धनी व्हायची तयारी ठेवावीच लागते.सुरुवातीला अपेक्षेइतकी प्रगती झाली नाही व काही वेळा अन्याय झाला तरी परंपरेच्या व समाज व्यवस्थेच्या नावाने खडे फोडून काही साध्य होणार नाही. एखादा भरवशाचा फलंदाज पंचाच्या चुकीच्या निर्णयाने नसतानाही बाद दिला गेला तरी त्याने पंचांना दोष देण्यात वेळ न घालवता पुढच्या ‘इनिंग'ची तयारी नेटाने करायची असते.तेव्हा आपण परंपरेचे बळी आहोत, आपल्या अपयशाला पुरुषप्रधान संस्कृती जबाबदार आहे असे नकारात्मक विचार झटकन प्रयत्नशील राहणे हे यशाचे गमक आहे.
नेतृत्व व त्याचे परिणाम : संस्थेचे किंवा त्यातील एखाद्या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी मिळनंं हा यशाचा परमोच्च बिंदू मानला जातो. नेतृत्व करणाऱ्याला पैसा,मानमरातब व प्रतिष्ठा उपलब्ध असते. तथापि, काही तोटेही सहन करावे लागतात.ते पुढीलप्रमाणे,

लोकप्रियता घट : प्रत्येक बॉसला आपल्या कनिष्ठांच्या खासगी अथवा प्रकट टीकला तोंड द्यावंं लागते. कारण तो त्यांना मागे सारून बॉस झालेला असतो. ती असूया किंवा नाराजी कनिष्ठांच्या मनाच्या कोपऱ्यात असतेच. हा मानवी स्वभावधर्म आहे. त्यामुळे बॉसला पेचात पकडण्याच्या संधीची ते वाट पाहत असतात विशेषतः महिला जर पुरुष स्पर्धकांना मागे सारून नेता बनली तर हे पद तिला कसं मिळालं,

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/६७