पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/७४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महिला व्यवस्थापक

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

ल आणि मूल ही मर्यादा महिलांनी ओलांडणं, ही विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील सर्वात महत्वाची सामाजिक क्रांती म्हणावी लागेल. आज 'करिअर' ही संकल्पना केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. करिअरच्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांंत खालपासूंंन वरपर्यंत सर्वत्र महिलांचा संचार होताना आपण पाहत आहोत.‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ हा काळ केव्हाच काळाच्या पडद्याआड गेला आहे. आणि ‌‌‍‌‍‍२१ व्या शतकात तर 'महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ....’ असं म्हणण्याऐवजी‘पुरुषमहिलांच्या खांद्याला खांदा लावून ...’ असं म्हणण्याची पाळी आली तरी आश्चर्यवाटावयास नको.

 दहावी किंवा बारावीच्या निकालांवर एक नजर टाकली तरी हा मुद्दा पुरेसा स्पष्टहोईल. २०-२५ वर्षांपूर्वी गुणवत्ता यादीच्या पहिल्या १० क्रमांकांमध्ये एखादी मुलगीअसायची. आज पहिल्या पाचात तीन निघाल्या तरी त्याचं विशेष वाटत नाही.शिक्षणाबरोबरच खेळ,कला, समाजसेवा, राजकारण इत्यादी क्षेत्रांमध्ये महिला केवळ सहभागी होताना नव्हे, तर यशाचं शिखर गाठताना दिसतात.
 उद्योगव्यवसायांचं क्षेत्रही याला अपवाद नाही. डॉक्टर, वकील अशा स्वतंत्रपणे केल्या जाणाऱ्या व्यवसायांमध्ये तर महिलांनी आपला ठसा उमटविला आहेच, शिवाय उद्योगांच्या व्यवस्थापनामध्येही त्यांचा वावर वाढला आहे.

 अर्थात महिलांची ही वाटचाल सहज झालेली नाही. व्यावसायिक व व्यवस्थापकीय गुण महिलांमध्ये पुरुषांच्या तोडीस तोड असले तरी समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी फारशी बदललेली नाही.महिलांच्या प्रगतीकडे पुरुषप्रधान समाज कौतुकाच्या नव्हे तर असूया व मत्सराच्या दृष्टीने पाहतो. स्त्रीने बाहेर काम करून कुटुंबासाठी पैसा मिळवावा,पण पारंपरिक कौटुंबिक जबाबदारयाही पार पाडाव्यात अशी दुहेरी अपेक्षा कित्येकदा बाळगली जाते.कामाच्या ठिकाणीही पक्षपाती वागणूक मिळणे, मानसिक छळ होणे,क्षमता असूनही केवळ महिला असल्याने संस्थेत उच्च पद न मिळणं, पुरुष सहकाऱ्यांकडून दडपण आणण्याचा प्रयत्न होणं इत्यादी समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अशा परिस्थितीत ‘यश कसे मिळवावे’ हा गहन प्रश्न त्यांना पडल्यास नवल नाही. एक यशस्वी व्यवस्थापक बनण्यासाठी महिलांनी काय करावं हाच प्रस्तुत लेखाचा विषय आहे.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/६५