पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घालायचे याचं समर्पक उत्तर तिने दिलं होतं. या महिलेकडे कौशल्यही आहे आणि कल्पकताही आहे असं म्हणावयास काही हरकत नाही.
 संस्थेमधील बहुतेक कर्मचाऱ्यांकडे कौशल्य असतं, पण अशी अंतर्दृष्टी असत नाही. ती फार थोड्या जणांकडे असते. आपण जे कार्य करीत आहोत ते केवळ चांगलं करणं महत्त्वाचे नाही, तर त्याचा कार्यकारणभाव समजून, उमजून करणंं महत्त्वाचंं आहे. यामुळे कामाची गती व गुणवत्ता यात कमालीची वाढ होते. कार्य समजून करणं यालाच अंतर्दृष्टी’ किंवा ‘इनसाईट' म्हणतात.कर्मचाच्याला तुम्ही विचारलंत, हे काम तू अशाच पध्दतीने का करीत आहेस? तो म्हणेल तशीच पध्दत आहे, पण अशीच पध्दत का आहे? दुसरी पध्दत वापरली तर काय होईल? याची उत्तरं तो देऊ शकणार नाही. कारण त्या दृष्टीने त्याने विचारच केलेला नसतो. असा विचार करणारे थोडेचजण असतात.
 अंतर्दृष्टीच्या पुढचा टप्पा म्हणजे दूरदृष्टी. आज आपण जे ज्या पध्दतीने करत आहोत त्याची उद्या (म्हणजेच भविष्यकाळात) काय किंमत असणार आहे, याचा विचार म्हणजे दूरदृष्टी. दूरदृष्टी असणारी माणसं केवळ आला दिवस पार न पाडता उद्या कार् होणार आहे? त्याचा आजच्या पध्दतीवर कोणता परिणाम होईल? त्याला तोंड देण्यासाठी आज कोणती तयारी करावी लागेल? याचा विचार करतात. त्यांना भविष्यकाळ दिसतो. ते चित्र डोळ्यांसमोर ठेवून ते आजचंं धोरण आखतात. त्यामुळे ते कायम इतरांहून पुढे राहतात.
 यानंतरची पुढची पायरी म्हणजे 'शहाणपण दूरदृष्टीचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करणारी माणसं अनेक आढळतात. त्यांना 'हुशार' म्हणता येईल, पण ती 'शहाणी' न्हवेत! दूरदृष्टीचा उपयोग आपली संस्था, समाज व मानवता यांच्यासाठीच करणं यातच खरंं शहाणपण आहे.
 वरील मुद्यांवरून आपल्याला असं लक्षात येईल की, माहिती, ज्ञान, कौशल्य, दूरदृष्टी व शहाणपण या शिकण्याच्या सहा पायऱ्या आहेत. बहुतेकांची मजल कौशल्य या पायरीपर्यंत जाते आणि तेथेच थांबते. मात्र व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना केवळ या अर्ध्या अंतरापर्यंत न थांबू देता पुढचे तीन टप्पे पूर्ण करण्यास प्रोत्चाहन दिलंं पाहिजे. हे सहा टप्पे पूर्ण केलेले कर्मचारी संस्थेत जितक्या जास्त संख्येने असतील तितकी अग्रणी राहील.

 वरील विवेचनाचे सार असे की, संस्कृत भाषेत गुरूची जी भूमिका असते ती आधुनिक काळात व्यवस्थापनाला पार पाडावी लागते. शिकवतो तो शिक्षक, पण शिकायला शिकवतो तो गुरू! संस्कृतमध्ये, माहिती देणाऱ्यास अध्यापक, ज्ञान देणाऱ्यास

अदभुत दुनिया व्यस्थापानाची/५७