पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


असतात. एखादा कर्मचारी संस्थेच्या कोणत्या क्षेत्रात कशा प्रकारचे योगदान करतो यावर त्याचं त्या क्षेत्रातील स्थान व पत ठरते. कर्मचाच्याची शैक्षणिक पात्रता, अनुभव, बुध्दी, कल्पकता व काम करण्याची इच्छा यावर त्याच्या योगदानाचं प्रमाण आणि मूल्य ठरते. सतत अभ्यास करून, नवं ज्ञान प्राप्त करून व प्रयोगशील वृत्तीने कर्मचारी आषलं योगदान वाढवू शकतो. संस्थेची उद्दिष्टपूर्ती या योगदानावरच अवलंबून असतं.
परिवर्तन मूल्य:
 संस्थेच्यां विवक्षित विभागात ठराविक काम करणार्या कोणत्याही कर्मचान्याच उदाहरण घ्या. समंबा अशा कर्मचार्यावर नेहमीचा विभाग सोडून दुसर्या विभागाची भिन्न कामाची जबाबदारी सोपविण्यात आली किंवा तो एक संस्था सोडून दुसन्या संस्थg गेला तर. नव्या वातावरणात त्याची कामगिरी कशी असेल? यालाच परिवर्तन मू> म्हणतांत. हे मूल्य तीन बाबींवर अवलंबून असतं. नव्या कामासंबंधीचे ज्ञान मिळविण्या त्याची क्षमता, आषलं कार्यक्षेत्र विस्तृत करण्याची क्षमता व नव्या ठिकाणी स्वतःची खास प्रतिमा किंवा प्रभाव निर्मिण्याची क्षमता . या तीन बाबी तो नव्या ठिकाणी कसा एकंजीव होतो ते ठरवितात. यापैकी नवे शिकण्याची क्षमता फार महत्वाची आहे. शिकावं कसं ते लहान मुलांकडून शिकावं.. मल. दोन, तीन महिन्यांचं झाल्यानंतर निरनिराळे आवाज काढून आजूबाजूच्या माणसांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते. आवाजाने आपण आपली इच्छा दुसच्यांच्या ध्यानात आणून देऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर ते आजूबाजूच्या माणसांची भाषा शिकू लागतं. एक वर्षाचे झाल्यानंतर मिळणाच्या माहितीचा एकमेकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ पाणी आपल्या ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करतं. तीन वर्षांच्या मुलाकडे तुम्ही पाणी माग. ते तुम्हाला ग्लासातून आणून देईल. यालाच 'कौशल्य' म्हणतात.

 शिकण्याची पुढची पायरी म्हणजे स्वयंप्रेरणा किंवा कल्पकता. मला जेव्हा रिकामा वेळ असतो त्यावेळी मी स्वयंपाकघरात जातो. माझी पत्नी आमटी करत असते. प्रथम ती पाणी उकळते. नंतर त्यात डाळ घालते, मग मसाले घालते. त्यानंतर मीठ, तिखट इत्यादी जिन्नस घालते. मी तिला गमतीने विचारतो, ‘प्रत्येक पदार्थ असा वेगवेगळी घालण्यापेक्षा एकदम सर्व एकत्र करून का नाही उकळत? यमुळे वेळ वाचेल नाः यावर ती रागावते आणि म्हणते, तुम्ही आधी माझ्या स्वयंपाकघरातून बाहेर हा! आमटी करण्याची माझी पध्दत अशीच आहे.’ माझी पत्नी खरोखरच आमटी उत्कृष्ट जब्नवते. तिच्याकडे कौशल्य आहेपण कल्पकता नाही. हाच प्रश्न मी एकदा माझ्या नात्यातील एका महिलेस विचारला होता, तेव्हा वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या वेळी का

मनुष्ध बळाचा अरदर व विकास/५६