पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यबळाचा आदर व विकास

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

साव्या शतकाच्या अंतापर्यंत जग दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर

पोचलंं. ही संगणक क्रांती आहे. संगणक युगात कर्मचाऱ्याचा उल्लेख 'ज्ञानाचारी' (नॉलेज वर्कर) असा होऊ लागला आहे. त्याच्या संगणकीय ज्ञानावर उद्योग क्षेत्राचंं भवितव्य अवलंबून असतं. साहजिकच त्यांचा आदर करणंं व प्रतिष्ठा जपणं, व्यवस्थापनाचं कर्तव्य बनलंं. पूर्वीच्या सरंजामशाहीच्या काळात नोकरांना पायताणाचीही किंमत दिली जात नसे. मात्र सध्याच्या संगणक युगातला उच्च विद्याविभूषित कर्मचारी उद्योगाचा प्राण बनला आहे. प्रत्यक्ष मालकालाही स्वतःच्या व्यवसायाबाबत जे ज्ञान नसतं ते कर्मचाऱ्याला असतं. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांचा मान राखणंं हे मालकांसाठी क्रमप्राप्त बनलं आहे. यातूनच मनुष्यबळ विकासाच्या नव्या कल्पना आकार घेत आहेत.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

आधुनिक काळातील मनुष्यबळ विकास :
 सध्याच्या काळात एखाद्या कर्मचाऱ्याला 'तयार'असेल म्हणजेच त्याचे कौशल्य, कार्यशक्ती व इच्छा यांचा विकास घडवायचा असेल तर पुढील तीन पैलू लक्षात घ्यावे लागतात. १. योगदान मूल्य (कॉन्ट्रिब्युशन व्हॅल्यू), २. परिवर्तन मूल्य (ट्रान्सफर व्हॅल्यू), ३. विश्राम मूल्य (लीजर मूल्य.
योगदान मूल्य :

 कर्मचारी व संस्था एकमेकांच्या अस्तित्वासाठी परस्परांच्या कार्यात योगदान करत

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /५५