पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


लक्षात येते. याच पुस्तकात एक प्रसंग असा दिला आहे की, एका व्यवस्थापकाने कर्मचार्याला एकाच वेळी पाच कामं सांगितली. संध्याकाळी कर्मचार्याने त्यापैकी चार पूर्ण केली होती, पण एक राहिले होते .संध्याकाळी कर्मचाऱ्याने व्यवस्थापकाला कामाचा अहवाल दिल्यानंतर त्याला सांगण्यात आलं, “अरे हे पाचवं काम महत्त्वाचे होते ,तू केलेली चार कामं उद्या केली असती तर चाललं असतं.‌‌"
 झाल्या प्रकारात कर्मचाऱ्याची चूक नव्हती. कारण त्याला कामाचंं नेमकं स्वरूप व महत्त्व सांगण्यात आलं नव्हतं. अशा परिस्थितीत त्या कर्मचाच्यांमध्ये कृतिशीलता कशी निर्माण होईल? कामाबद्दलचा संभ्रम कृतिशीलतेवर वाईट परिणाम घडवतो. यासाठी मोजक्या शब्दांत पण कामाचंं नेमकं स्वरूप कर्मचाच्याला सांंkगण्याचा गुण व्यवस्थापकाने विकसित करणे आवश्यक आहे.
 काम समजावून देताना नको इतक्या सविस्तरपणे ते समजावणं किंवा अर्धवट समजावणंं या दोन्ही बाजू चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण मानता येणार नाही. तसंच काम यशस्वी झाल्यानंतर त्याचं अति कौतुक करणे किंवा अयशस्वी झाल्यानंतर वाजवीपेक्षा जास्त कठोर शब्दांत, कर्मचाच्याला फटकारणं विशेषत: त्याचा त्याच्या सहकाच्यांसमोर थोडक्या चुकीसाठी उपमर्द करणं, त्याच्या कृतिशीलतेला घातक ठरू शकतं. अशा व्यवस्थापकांच्या हाताखालचे कर्मचारी नेहमी दडपणाखाली वावरतात. कामाचा दर्जा राखण्यापेक्षा त्यात काही चूक राहू नये, याचीच चिंता त्यांना अधिक वाटत राहते. त्यामुळे योग्य त्या ठिकाणी धोका पत्करून किंवा स्वतःची कल्पनाशक्ती वापरुन आपली जबाबदारी पूर्ण करणंं त्याला जमत नाही. अंतिमत: त्याचा परिणाम पूर्ण संस्थेला भोगावा लागतो. त्यामुळे कौतुक व समज या दोन्ही गोष्टी संयमित नियंत्रित व किमान शब्दांत दिल्या गेल्या पाहिजेत.
प्रामााणिकपणा :

 आपण काम करत असताना मनात दोन तर्हेची धास्ती असते .पहिली म्हणजे मी काही चुकीचे केलं तर दुसर्याला याचा त्रास होईल .तर दुसरी धास्ती म्हणजे मी काही चुकीचं केलं तर मलाच दुसच्यांकडून त्रास होईल. माणूस जेव्हा उच्च पदावर पोचतो व त्याच्या हातात अधिकार येतो त्यावेळी त्याला पहिली धास्ती अधिक जाणवते. हाच प्रामाणिकपणाचा निकष आहे. आपल्याला त्रास होऊ नये यासाठी सर्वजण जागरूक असतातपण आपल्यामुळे दुसच्याला त्रास होऊ नये म्हणून सावध राहणंं यालाच कामाच्या बाबतीत प्रामाणिकता असं म्हणतात. आपले पद कोणतंंही असलं तरी हा गुण प्राधान्याने विकसित करणे ही उत्तम व्यवस्थापकाची जबाबदारी आहे .याबरोबरच इतरही अनेक बाबींकडे व्यवस्थापकाला लक्ष पुरवावे लागते. याचा विचार पुढच्या लेखात करू.

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची /४७