पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२८१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

 व्यवस्थापन क्षेत्रातील शरू रांगणेकर हे मोठे नाव. भारत अन् भारताबाहेरही त्यांनी या क्षेत्रात भरघोस कार्य केले आहे.
 अमेरिकन विद्यापीठात व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी तेथेच विविध उद्योगांमध्ये उच्च पदे भूषविली. त्यानंतर ते भारतातील अनेक नामवत आस्थापनांमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. १९७८ साली सेवानिवृत्त झाल्यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अन् काही प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. त्यांनी जवळजवळ पाच हजार व्यवस्थापनविषयक कार्यशाळा घेतलेल्या आहेत. एक प्रभावी वक्ता अन् उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. व्यवसायाने केमिकल इंजिनियर अन् उच्चपदस्थ व्यवस्थापक असलेले शरू रांगणेकर मराठी कथाक्षेत्रातही समर्थपणे आपली हजेरी लावत असतात.
 भारतातील व्यवस्थापन क्षेत्रातील कितीतरी मजेदार कथा त्यांनी ‘इन द वंडरलँँड ऑफ इंडियन मॅनेजर्स' आणि 'इन द वर्ल्ड ऑफ कार्पोरेट मॅनेजर्स' या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे व्यस्थापन जगतात ती दोन पुस्तकं दीपस्तंभासारखी इच्छूक व्यवस्थापकांना दिशा दाखवत ठामपणे उभी आहेत.
 अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची हे नवीन पुस्तक व्यवस्थापन शास्त्राचे अभ्यासक, त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना व रसिकांच्या पसंंतीला नक्कीच उतरेल याची आम्हाला खात्री आहे!

राजेंद्र वाणी

अग्रणी प्रकाशन

औरंगाबाद