पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मचाच्यांकडून काम करून घेणं, त्यांनी अधिक व चांगलं काम करावं यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती, संस्थेच्या विविध विभागांमध्ये चांगला समन्वय व संपर्क इत्यादी जबाबदारी अंतर्गत व्यवस्थापनाची असते. या दोन्हींचा समतोल उत्तम सांभाळणं हे संस्थाप्रमुखाचं काम असतं आणि हे साध्य झाल्यास संस्था यशस्वी होते.
 कार्यप्रवणता,सत्यनिष्ठा,संपर्क साधण्याचं कौशल्य,बदल स्वीकारण्याची तयारी,दूरदृष्टी व सहकार्याची भावना ही व्यवस्थापनाची पाच मूलभूत तत्त्वं आहेत.कार्य कोणतंही असो, ते या पाच तत्त्वांत बसवल्यास त्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं होतं. या लेखमालेच्या विविध लेखांमध्ये आपण बिर्ला,अमूल’चे कुरियन इत्यादी अनेक व्यक्तींचे संदर्भ घेतले.त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आभाळाएवढं आहे.आदर्श नेहमी मोठेच असावे लागतात.पण याचा अर्थ असा नव्हे की ,सर्वसामान्यांनी स्वतःला क्षुद्र समजावं. ज्ञानेश्वर म्हणतात,

राजहंसाचे चालणे । जगी जालिया शहाणे ।


म्हणोनी काय कवणे । चालोची नये ।।


 अर्थ असा, राजहंसाचं चालणे हे जात सर्वात डौलदार व सुंदर समजलं जातं.पण याचा अर्थ असा नव्हे की अन्य कुणी चालूच नये.
 तद्वतच व्यवस्थापनाची तत्त्वं केवळ मोठ्यांसाठीच आहेत अस समजण्याचंं काही कारण नाही.बेताचं शिकलेली पण कल्पक अश गृहिणी असते. पतीच्या मर्यादित उपन्नात तिला सुबकपणे संसार करावयाचा असतो. महिन्याच्या पाच तारखेला पतीनं तिला पाच-सहा हजार रुपये दिलेले असतात.पुढच्या महिन्याच्या पाच तारखेपर्यंत तिला त्यावर संसार चालवायचा असतो.अशा वेळी ती काय करते?

 हातात असलेल्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करते. आवश्यक धान्य,दूध,भाजीपाला,इतर जिनस कुठं स्वस्त मिळतात हे पाहते. मात्र केवळ काटकसर हा उद्देश नसतो.तर वस्तूच्या गुणवत्तेकडे ही लक्ष देत.कोणतेही सामुग्री वायफळ जाऊ दत नाही.गँँस,विजेचा वापर जपून करते. मुलांचे अतिलाड करत नाही. पण शक्यतो त्यांना काही कमीही पडू देत नाही. निवडणं, टिपणं, झाडलोट शक्य स्वतःच करते.मात्र सर्व जबाबदारी आपणच उचलत नाही. मुलांना आणि पतीलाही कधी गोड बोलून तर कधी शिस्तीचा बडगा दाखवून घराची काही कामं करावयास ती भाग पाडते. मुलाच्या अभ्यासाकडी अजिबात दुर्लक्ष होऊ देत नाही.शिळेपाकं उरलंच तर तेही वाया जाऊ देत नाही, इतकंच नव्हे, तर आल्या गेल्या पैपाहुण्यालाही आनंद वाटेल याची खबरदारी घेते. हे करताना काही वेळा तिला स्वतःच्या काही इच्छा माराव्या लागतात. पण ते ती फारसं मनावर घेत नाही आणि एवढंं करूनही महिन्याकाठी चारपाचशे शिल्लक

समारोप करताना/२७१