पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समारोप

वस्थापन’ या विषयावर गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ मी ही लेखमाला चालविली आहे.हा विषय क्लिष्ट, नीरस आणि उच्च्पदस्थांनाच उपयोगी आहे,ही सार्वत्रिक समजून दूर करणं आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्याचा तत्त्वे बारकावे आणि उपयुक्तता समजून देणे या उद्देशानं ही लेखमाला सुरू करण्यात आली होती. वाचकांचा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत गेल्यानं हा उद्देश सफल झाला असं म्हणावयास काही हरकत नाही.

 या विषयाला विशिष्ट अशी मर्यादा नाही. मानवाच्या यच्ययावत सर्व व्यवहारांमध्ये व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. किंबहुना उत्तम व्यवस्थापनाशिवाय कोणत्या ही कार्याची अगर व्यवहाराची यशस्वी सांगता होत नाही. चार माणसांचं (अलीकडचा काळात तर तीनच) छोटे कुटुंब सुखानं चालवायचं असो अगर तीन चार हजार कर्मचारी असलेला असलेला कारखाना किंवा संस्था असो, चालक जितका व्यवस्थापन कुशल तितकं यश अधिक असं सूत्र आहे. व्यवस्थापन ही एक कला तसंच एक शास्त्र आहे. घर,शाळा,महाविद्यालय,कारखाना,सेवा केंद्र, समाजिक संस्था,राजकाय पक्ष दुकान, हॉटेल क्लब, सरकारी कार्यालय, खाजगी अगर सरकारी कंपन्या इत्यादी कोणतीही संस्था असोत आणि यांना अनन्यसाधारण तेथे व्यवस्थापन व्यवस्थापक महत्त्व उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेतील बाहेरील घटकांकडून असतेच. संस्थेच्या व विविध शास्त्रशुध्द व नियमबध्द पध्दतीने काम करून घेणे आणि निर्धारित वेळेत उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे व्यवस्थापन अशी त्याची सर्वसाधारण व्याख्या करता येईल.

 याचे दोन भाग आहेत. एक बहिर्गत व्यवस्थापन आणि दोन अंतर्गत व्यवस्थापन संस्था सुरू करण्यापूर्वी व झाल्यानंतर तिच्यासाठी आर्थिक स्रोतांची जुळवाजुळव, कर्मचाच्यांची निवड,साधने अगर यंत्रसामुग्री खरेदी, तयार होणाच्या उत्पादनाचा किंवा सेवेची विक्री, पुरवठादार व ग्राहकांशी संबंध, सरकार व इतर समाज घटकांशी संपर्क इत्यादी काम बहिर्गत व्यवस्थापनाचा एक भाग असतात. तर उत्पादन, त्याच्या गुणवत्तेच संवर्धन,

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२७०