पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


विधिमंडळात मांडण्यात आला. काही सदस्यांनी त्याला विरोध करताना म्हटलं की,सर्व इमारतींना रॅम्प बांधण्यासाठी अतिप्रचंड खर्च करावा लागेल. त्याऐवजी वृध्द व अपंगांना घरी बसण्यासाठी सबसिडी दिली तर ती स्वस्त पडेल.मात्र हा प्रश्न पैशाचा नसून मूलभूत अधिकारांचा आहे असं प्रत्युत्तर देण्यात आले व प्रस्ताव बहुमतानं संमत करण्यात आला.
 भारतातील परंपरा असमानतेची आहे हे मान्य करावे लागेल.पुरुषांचं महिलांवर वर्चस्व,उच्च जातीचं कनिष्ठ जातीवर वर्चस्व इत्यादी कालबाह्य संकल्पनांना आपण आजही कवटाळून बसलो आहोत. आपल्या व्यावसायिक आयुष्यातही त्या डोकावत असतातच.
 वयानुसार ज्ञान वाढतं ही आणखी एक भारतीय संकल्पना आहे, पण सध्याच्या झपाट्यानं बदलणाच्या तंत्रज्ञानाच्या युगात ती कालबाह्य ठरली आहे.
 तिसरी भारतीय संकल्पना म्हणजे पुरेसं निरीक्षण किंवा सर्वेक्षण न करताच निष्कर्ष काढून तोच कवटाळून बसण, यातूनच अंधश्रध्दांची निर्मिती होते. चुकीच्या परंपरा रूढी होतात.
 पाश्चात्य मूल्ये आणि भारतीय मूल्य यांची चढाओढ भारतात सुरू झाली आहे.

 समानता व ज्ञानाचा आदर करणारी मूल्येच या स्पर्धेत टिकून राहतील.बाकीची रद्द ठरतील.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२६६