पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय नीतिमूल्ये : समज - गैरसमज

झ्या एका शिक्षक मित्राला निवृत्तीनंतर मूत्रपिंडांची समस्या जाणवू लागली. डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लॅटचा सल्ला दिला. पण ही शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला निवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम खर्च करावी लागली असती. मित्राला कॉलेजात शिकणारी दोन मुले होती. त्यांच्या शिक्षणाला आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या पत्नीसाठी मग त्याच्याकडे पैसा उरला नसता. त्यानं पत्नीला सल्ला विचारला.

 पत्नीनं व्यवहार्य विचार करून सांगितलं, पैसा माझ्या व मुलांच्या भवितव्यासाठी राखून ठेवा.
 हे उत्तर आपल्याला विचित्र वाटेल. या पत्नीला भारतीय संस्कृती माहीत आहे की नाही असाही प्रश्न आपण विचाराल. पण ही घटना सत्य आहे. 'भारतीय नीतिमूल्यां'मध्ये होत असलेल्या बदलांचे ते संकेत आहेत.
 आता दुसरं उदाहरण पाहा. १९७८ मध्ये 'निवृत्तीनंतरचे जीवन’ या विषयावर अमेरिकेत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो होतो. प्रशिक्षणार्थींना एक प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. त्यातील दोन प्रश्नांनी माझे लक्ष वेधून घेतलं.
 १) आपण निवृत्त झाल्यानंतर आपले मातापिता आजारी पडले, तर त्यांची काळजी आपण स्वत: घ्याल की सरकारी रुग्णालयात सुविधा समाधानकारक नसतात हे माहीत असूनही त्यांना तिथं ठेवाल?
 २) आपण निवृत्त झाल्यावर आपल्या मुलानं व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या निवृत्ती निधीतील ३० टक्के रक्कम मागितली. आपण ती रक्कम त्याला द्याल की आपल्या व पत्नीच्या चरितार्थासाठी राखून ठेवाल?
 या प्रश्नाचे अधिकृत उतर 'पत्नी व आपल्यासाठी रक्कम राखून ठेवा असं होतं

१९७८ मध्ये या उत्तराला आपण ‘पाश्चात्य संस्कृती’ म्हणून हिणवत होतो. पण याच नीतिमूल्यांनी आता शहरी भागातही शिरकाव केल्याचे आपल्याला पहिल्या

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२६४