पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्रयी महत्त्वाची ठरते. आणि हे संस्कार शैक्षणिक जीवनातच व्हावे लागतात.
 त्यामुळं परीक्षेत यश मिळविण्याचे झटपट उपाय कितीही असले किंवा निर्माण झाले तरी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता कमी होत नाही. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये घरच्यापेक्षा चवदार आणि वैविध्यपूर्ण पदार्थ मिळत असले व ते खाण्याकडंं नव्या पिढीचा ओढा अधिक असला तरी शरीरप्रकृतीचा दीर्घकालीन विचार करता घरच्या जेवणाची तुलना कशाशीच होत नाही. परीक्षेमधील यश आणि विषयाचंं ज्ञान यात हाच फरक आहे. अर्थात हे दोन्ही मिळवन देणाऱ्या शिक्षणामध्येही तोच फरक आहे. म्हणूनच शिकवण्या, परीक्षेत यश मिळवून देणारी पुस्तकं इत्यादींकडून कितीही स्पर्धा होत असल्या तरी, शिक्षण संस्था आणि त्यातील शिक्षक यांनी 'एकलव्य' बनविण्याचं आपलं कार्य निरंतर सुरू ठेवणंं आवश्यक आहे.

 व्यवस्थापन शिक्षणातही आज अनेक नवे नवे विषय निर्माण झाले असून त्या सर्वाचं ज्ञान दोन-चार वर्षांच्या शिक्षणक्रमातूून घेणंं अशक्य आहे. शिक्षण संपवून व्यवसाय सुरू केल्यानंतर त्या ज्ञानात नित्य नवी भर टाकणंं गरजेचंं आहे आणि त्यासाठी व्वस्थापकानं एकलव्य असणंं जरुरीचं आहे.

युग ‘एकलव्याचं'/२६३