पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

न करता स्वतःच्या बळावर विषयात पारंगत होण्याची वृत्ती विद्यार्थ्यात निर्माण करणंं हेच खरं शिक्षकी कौशल्य आहे.
 गेल्या काही हजार वर्षांमध्ये शिक्षक आणि त्याचे विषय यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. तरी शिक्षकाची ही मूळ जबाबदारी कायम आहे.
 पुुरातन काळी विद्यार्थी वयाच्या आठव्या वर्षी शिक्षणासाठी गुुरुगृही जात. तेथे त्या काळी शिकविल्या जाणाच्या सर्व विषयांचे ज्ञान एकाच गुरूकडून घेत. आजच्या आधुनिक शिक्षण पध्दतीत एकाच विषयाचे विविध भाग शिकविण्यासाठी वेगवेगळे शिक्षक असतात. एकंदर शैक्षणिक जीवनात विद्यार्थी विविध शिक्षण संस्थांमधून किमान शंभर शिक्षकांच्या हाताखालन जातो. यापैकी प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्याचा एकलव्य बनवतोच असे नाही. कित्येक शिक्षकांचंं लक्ष केेवळ 'पोर्शन कम्प्लीट' करण्याकडे असतं. मात्र, विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल आस्था निर्माण करणारे शिक्षकच आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतात.
 विद्यार्थ्यांच्या मानसिकतेतही आज बदल झाला आहे. शाळा-कॉलेजातून मिळणाऱ्या औपचारिक शिक्षणापेक्षा शिकवणीला जाऊन अधिकाधिक गुण मिळविण्याकडंं त्यांचा कल आहे. कॉलेजातील वर्गांंमध्ये ३० टक्केसुध्दा हजेरी नसते. पण कोचिंग क्लासेस मात्र ओसंडून वाहत असतात. कारण उघड आहे. केवळ उपचार पूर्ण करण्याच्या दृष्टीनंं कॉलेजात दिल्या जाणाऱ्या शिक्षणात वेळ खर्च करण्यापेक्षा जास्त गुुण मिळवून पुढील मार्ग मोकळा करणारं शिक्षण विद्यार्थ्यांना अधिक भावतं. कोचिंग क्लासेसमध्ये असंच शिक्षण दिलं जातं.
 आताचा विद्यार्थी रिझल्ट ओरिएंटेड' आहे. जास्तीत जास्त गुण मिळवून देणं हेच कोचिंग क्लासेसचंं ध्येय असतं. मात्र कॉलेजमधील शिक्षकाचं मुख्य काम ज्ञान देणं ही असतंं.
 शैक्षणिक संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या औपचारिक शिक्षणाला आणि शिक्षकांना सध्याच्या काळात काही महत्त्व उरलं आहे की नाही आणि असल्यास त्यांची भूमिका कोणती, असा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाला आहे.

 त्याचं महत्त्व निश्चितच आहे. शिकवण्यांमधून गुणांची निश्चिती होत असली तरी विषयाचंं सखोल ज्ञान आणि ते मिळविण्याची लालसा तितकीच महत्वाची आहे. गुणांचा उपयोग पुढील शिक्षणाकरिता प्रवेश मिळविण्यासाठी होत असला तरी तो तात्कालिक असतो. शिक्षण संपल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करताना आणि त्यात यशस्वी होताना परीक्षेत मिळालेले गुण उपयोगी पडत नाहीत. तिथं ज्ञानाची लालसा, नवं शिकण्याची प्रवृत्ती आणि ज्ञानात भर घालण्यासाठी प्रयत्न करण्याची सवय हीच

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२६२