पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेळापत्रक तयार करणंं इत्यादी 'ग्राऊंड वर्क’ अगोदर तयार करून ठेवल्यास अनिश्चित कामाचं स्वरूप बच्याच प्रमाणात निश्चित करता येतंं आणि एकदा कामाचंं स्वरूप निश्चित झालं की, तणाव पुष्कळसा कमी होतो.
संबंधातून निर्माण होणारे तणाव :
 व्यवस्थापकाला त्याचा बॉस, सहकारी, कनिष्ठ सहकारी, कामगार संघटना, ग्राहक, पुरवठादार इत्यादींशी संबंध राखावे लागतात. हे संबंध जितके समतोल तितकी त्याची कामगिरी प्रभावी होते. मात्र हा समतोल राखणंं, ही जिकिरीची बाब आहे. हे करताना प्रचंड मानसिक ताण सोसावा लागतो.
 हा ताण सहनीय पातळीवर आणण्यासाठी पाच कलमी प्रक्रिया उपयोगी पडते.
१) संयम राखून ’थांबा आणि वाट पाहा' या धोरणाचा अवलंब करणे:
 व्यवस्थापकाला वरिष्ठांच्या किंवा सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असते तशी त्यांनाही असते .त्यामुळंं सुरुवातीच्या काळात काही मतभेद निर्माण झाले तरी शब्दाशब्दी करून वातावरण न तापविता संयमाने स्थिती हाताळावी आणि आपलंं काम करीत राहावं. व्यवस्थापकाची कामाची पध्दत योग्य असेल तर काही काळाने ती इतरांना पटल्यावाचून राहत नाही. विशेषत: ज्या व्यवस्थापकाला' एकटं' पाडल जातं, त्याच्यासाठी हा उपाय परिणामकारक आहे.कारण चर्चेच्या वेळी अशा' आयसोलेटेड' व्यवस्थापकाचं म्हणणं इतर सहकारी मान्य करीत नाहीत.अशा वेळी ते आपल्या कामातून पटवून देणे त्याच्या हातात असतं. यासाठी संयमाची आवश्यकता आहे.
२) तणाव निर्माण करणाच्या सहकार्याश चर्चा:
 कित्येकदा सहकारी किंवा वरिष्ठांना मुद्दाम तणाव निर्माण करून स्वतःचं महत्त्व सिद्ध करण्याची सवय असते.तर बघ्याचदा प्रामाणिक मतभेदांमुळे तणाव निर्माण हाेेतात. अशा वेळी सामोपचारानं चर्चा करून वाद मिटवणं लाभदायक आहे. यामुळे मनं मोकळी होऊन तणाव पुष्कळसा निवळतो.
३) योग्य वेळी लढाऊ बाणा प्रकट करणं :

 वाटाघाटी व चर्चा या मार्गानं तणाव दूर न झाल्यास योग्य वेळी ठामपणे आपलं म्हणणं स्पष्ट मांडण्याची हिंंमत व्यवस्थापकानंं दाखवलीच पाहिजे जो आपल्या मताशी कोणतीही तडजोड करणार नाही. त्यासाठी लढण्याची त्याची तयारी आहे हे इतरांच्या लक्षात आल्यास ते नरमाईची भूमिका घेण्याचा संभव असतो.तेही न घडल्यास वेळप्रसंगी काम सोडण्याची तयारी दाखवावयास हवी. ताण सहन करून मनाविरुध्द काम करीत राहण्यापेक्षा इतरत्र संधी शोधणे शरीरस्वाथ्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. तेव्हा एखादी कंपनी किंवा एखादं काम हा प्रतिष्ठेचा मुद्दा न बनविता त्यातून बाहेर

तणावांंवर उपाय/२५९