पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तणावांवर उपाय


वस्थापकावर पडणाच्या तणावांवर उपाय करण्यासाठी प्रथम तणावांचा स्त्रोत

शोधणंं आवश्यक आहे .तणावांचे मूलत: तीन स्रोत असतात.
 १. कामाचं अनिश्चित स्वरूप
 २. संबंधातून निर्माण होणारे तणाव
 ३. व्यक्तिगत समस्या
कामाचं अनिश्चित स्वरूप :
 व्यवस्थापकावर एखादी जबाबदारी सोपविली जाते, तेव्हा कित्येकदा तिचं स्वरूप निश्चित व आखीव नसतं. किंबहुना सक्षम व्यवस्थापकांवर अशीच कामं अधिक प्रमाणात सोपविली जातात.काम सोपविताना फक्त व्यवस्थापकाला फक्त कामाची बाह्य रूपरेखा, काम संपविण्यासाठीचा अवधी आणि फलनिष्पत्तीची अपेक्षा इतकंच सांगितलं जातं. त्यानंतर व्यवस्थापकालाच त्याबाबत निर्णय घेऊन ठराविक कालावधीत अपेक्षित परिणाम साध्य करून दाखवावा लागतो.
 त्यामुळे पुष्कळदा गोंधळ निर्माण होऊन मानसिक ताण वाढतो. अशी अनिश्चित स्वरूपाची कामे करताना व्यवस्थापकाला स्वतःलाच कामामधली त्याची भूमिका, इतर सहकाच्यांचे स्थान काम करण्याची पध्दती इत्यादीबद्दलचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे सहकाच्यांशी मतभेद, कामाच्या पध्दती ठरविताना होणारी ओढाताण,अन्य सहकाच्यांना कामाचंं स्वरूप समजावून सांगताना करावी लागणारी कसरत इत्यादीमुळंं त्याच्यावरील ताण वाढतो.

 अशावेळी थेट कामाला सुरुवात करण्याऐवजी प्रथम कामाचं चिंतन करण" त्याबाबत एक निश्चित संकल्पना स्वतःच्या मनात प्रथम निर्माण करणं स्वतःच्या कंपनीतल्या किंवा बाहेरच्या अनुभवी विचारविमर्श करणं, कामाचा व्यवस्थापकांशी कागदावर सविस्तर आराखडा तयार करणं, कामाचा कोणता भाग कुणाकडून करून घ्यायचा त्याबाबत विचार करनं व त्याप्रमाणं कनिष्ठ कर्मचाच्यांची निवड करणंं (म्हणजेच कामाचं विकेंद्रीकरण करणं), आणि कामाच्या सुरुवातीपासून पूर्तींपर्यंतच

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२५८