पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२६०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारपेठ मिळत असे. त्यामुळे अशा जातीचे लोक पिढ्यानपिढ्या तोच उद्योग किंवा व्यवसाय करून पोट भरीत. आजही याच प्रमाणात ही ठेवण टिकून आहे.
 इंग्रजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर भारताला पाश्चात्य आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा परीचय झाला. या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सरू केले. मानवी शक्तीचा वापर करून उत्पादन बनविण्यापेक्षा यंत्रांच्या साहाय्याने कमी श्रीमंत प्रचंड, प्रमाणात स्वस्त व चांंगल्या दर्जाचं उत्पादन हे इंग्रजी उद्योगांचं वैशिष्ट्य होतं. ती स्वीकारल्यानंतर मूळ भारतीय उद्योगपध्दती मागे पडत जाऊन नवी औद्योगिक घराणी जन्माला आली.
 आधुनिक उद्योगांचा अंगीकार केला गेला, तरी ते चालविण्याची व त्यांचे नियंत्रण हस्तांतरित करण्याची पध्दती मात्र जुनीच राहिली. पुुढच्या पिढीची योग्यता असो किंवा नसो अगोदरच्या पिढीतील उद्योगपतींनी उभ्या केलेल्या औद्योगिक साम्राज्याची सूत्रं जन्मसिद्ध हक्कानुसार नव्या पिढीकडे जात राहिली व अजूनही जात आहेत. नव्या पिढीतील सर्वच व्यक्ती नशिबानं मिळालेला हा वारसा चालविण्यास समर्थ नव्हत्या किंवा नाहीत असा त्याचा अर्थ नव्हे. अनेकांना व्यवसायाचे हे बाळकडू लहानपणापासून घरातच मिळाले असल्याने त्यांनी वडिलोपार्जित व्यवसायाची प्रचंड भरभराट केल्याचीही उदाहरणे आहेत. बच्याच औद्योगिक घराण्यांशी संधान बांधण्याची कलाही अवगत करून घेेऊन व्यवसाय टिकविले व वाढविले. गेल्या दशकापर्यंत देशात असलेल्या बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे हे शक्य झालं.अशा अर्थव्यवस्थेची सर्व सूत्रे राजकारण्यांच्याच असल्याने त्यांना धरून राहून काही घराण्यांनी आपला विकास साधून घेतल्याचीही उदाहरणे आहेत.
 गेल्या सुमारे २० वर्षापासन परिस्थिती झपाट्यानं बदलत आहे.जगभरात मुक्तीचं वारं वाहत आहे. अर्थव्यवस्थाही त्यापासून अलिप्त राहिलेली नाही. आर्थिक सुधारणाचा वेग जसा वाढत आहे, तसे उद्योगांचे जाती व राजकारणी यांच्यावरील अवलंबित्व कमी होत आहे. सांप्रत काळात उद्योगाचं अस्तित्व उद्योजकाची जात किंवा राजकीय लागेबांधे यावर अवलंबून न राहत, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी,भांडवल उभे करण्याची तयारी, उत्पादनांची गुणवत्ता व किफायतशीरपणा आणि ग्राहकांची पसंती यावर अवलंबून आहे.कारण माणूस हा पूर्वीप्रमाणे केवळ ‘सामाजिक प्राणी न राहता आर्थिक प्राणी’ बनला आहे.

 या बदलत्या परिस्थितीची झळ भारतातल्या कुटुंब नियंत्रित उद्योगांना जाणवू लागली आहे. याखेरीस मोठ्या औद्यागील घराण्यामध्ये कालांतराने पडणारी फुट घराण्यांच्या सदस्यांमधले हेवेदावे व्यक्तिगत स्वार्थासाठी एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणे इत्यादी समस्याही भेडसावत आहेत. पूर्वी अशा उद्योगांमध्ये महत्वाच्या

कुटुंब नियंत्रित उद्योगांचं भवितव्य /२५१