पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नीतिमूल्ये आणि आचारसंहित


तवणूकदार, ग्राहक, पुरवठादार, सरकार इत्यादी समाजघटकांशी कोणत्याही संस्थेचे विशिष्ट असे संबंध येत असतात. या संबंधांमधून संस्थेची आचारसंहिता विकसित होत जाते. मागच्या लेखात हे संबंध कालांतराने त्यांच्यात कसे बदल होत गेले याविषयी माहिती घेतली. या तसेच इतर प्रकारच्या परिस्थिती परिवर्तनाचा उद्योगांच्या नीतिमूल्यांवर व आचारसंहितेवर कसा परिणाम होतो व ती कशी उत्क्रांत होते या बाबत या लेखात समजून घेण्याचा प्रयत्न करू.

 औद्योगिक क्रांतीच्या प्रारंभीच्या काळात गुंतवणूकदारांच्या हितसंबंधांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाई. त्यानंतर इतर घटकांचा विचार होई. मात्र तीव्र स्पर्धेमुळे ग्राहकांना आधिक महत्त्व प्राप्त झालं.
 कंपनी किंवा संस्थांच्या अंतर्गत रचनेतही गेल्या काही दशकांत क्रांतिकारक बदल झाले आहेत. पूर्वी पुष्कळसे उद्योग कुटुंबांच्या मालकीचे असत. त्यामुळे मालक कुटुंब ठरेल त्या धोरणाचं पालन व्यवस्थापकांना करावं लागे. ‘व्यावसायिक व्यवस्थापना'पेक्षा 'मालकी हक्क’ ही संकल्पना अधिक प्रचलित होती. मात्र, सध्याच्या काळात एखादे कुटुंब किंवा एक-दोन व्यक्ती यांच्या हातातील उद्योगांपेक्षा असंख्य छोट्या समभाग धारकांची बनलेल्या व तज्ज्ञ व्यवस्थापकांनी चालविलेल्या संस्थांची संख्या वाढत आहे.
 यामुळं उद्योगांची नीतिमूल्ये आणि आचारसंहिता यांचा विकास निराळ्या पध्दतीनं होत आहे. या बदलांचा स्वीकार टाटा, गोदरेज इत्यादी कुटुंब नियंत्रित संस्थांनाही करावा लागत आहे. कंपन्या दूरदृष्टी, ध्येयवाद व तत्त्वज्ञान यांची भाषा बोलू लागल्या आहेत. तथापि, भारतीय कंपन्यांच्या आचारसंहितेमध्ये हे बदल अजूनही धिम्या गतीनंच होत आहेत.
बहुराष्ट्रीय कंपन्यांचा परिणाम :

 गेल्या काही वर्षांत आर्थिक सुधारणांची गती वाढल्यानं व अर्थव्यवस्था निर्बंधमुक्त झाल्याने अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देशात बस्तान बसविलं आहे. या कंपन्यांची मूळ कंपनी अमेरिका किंवा युरोपियन देशांत असते. तिच्या तेथील आचारसंहितेचा परिणाम

नीतिमूल्ये आणि आचारसंहिता /२४७