पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन आणि नीतिमूल्ये

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

धुनिक व्यवस्थापनात सध्या नीतिमत्ता, व्यावसायिकता आणि मूल्य हे शब्द परवलीचे झालेत. व्यवस्थापनाशी संबंधित प्रत्येक चर्चासत्रे आणि संमेलनात त्यांची उधळण होतेय. पण या तिन्ही संकल्पनांविषयी व्यवस्थापकांच्या मनात बराच गोंधळ आणि गैरसमज आहे. कित्येकांना हे केवळ शब्दांचे खेळ वाटतात. पण व्यवस्थापनात यांना खास स्थान आणि महत्त्व आहे.

 प्रथम आपण मूल्य किंवा व्हॅल्यूज यांचा विचार करू. आपल्या अनेक प्राथमिकता असतात. आपण त्यांची एक क्रमवारी आखलेली असते. ही क्रमवारी म्हणजेच आपले मूल्य होय. उदाहरणार्थ, एखाद्या आईसमोर दोन पर्याय आहेत. एक घरी थांबून मुलांचा अभ्यास घेणंं आणि दोन किटी पार्टीला जाऊन मजा करणंं. यापैकी कोणत्या पर्यायाला ती प्राधान्य देते यावर ‘आई' या संदर्भात तिचं मूल्य ठरेल.
 ही क्रमवारी प्रत्येकाची स्वतंत्र असते. त्यांना सामाजिक संदर्भही असतो. सनातनी परंपरेनुसार पुरुषाने बाहेरची कामं पाहायची आणि कुटुंबासाठी अर्थार्जन करायचंं आणि स्त्रीनं घर सांभाळायचं अशी रीत आहे. महिला सुशिक्षित होऊ लागल्या, तशा पुरुषांच्या बरोबरीनंं बाहेरची कामं पाहू लागल्या. त्याबरोबर हा सामाजिक संदर्भही बदलला.

 व्यवसाय किंवा उद्योग या प्रामुख्यानं आर्थिक घडामोडी आहेत. त्यामुळंं 'पैसा' हे त्याचं प्रमुख मूल्य आहे. ते पूर्णपणे भौतिक आहे. मात्र, या भौतिक मूल्याची सांगड आपण आपल्या आध्यात्मिक परंपरेशी घालण्याचा प्रयत्न केला तर गोंधळ निर्माण होतो. सनातनी प्रवृत्तीची माणसं पैशाच्या मागंं लागणं हे पाप आहे. आपल्या उच्च संस्कृतीच्या ते विरुध्द आहे किंवा ते पाश्चात्यांंचंं अंधानुकरण आहे अशा समजुतीत असतात आणि इतरांचीही तशीच समजूत करून देण्यात धन्यता मानतात. भारतीय वर्णव्यवस्थेनुसार वैश्य म्हणजे व्यापारी किंवा पैसे मिळविणारा याला तिसरं स्थान आहे. इथंच कशाला, ब्रिटनमध्ये आजही पाठीमागचं प्रवेशद्वार हे वैश्यांकरता असतंं. दोनशे वर्षांपर्वी घडलेल्या औद्योगिक क्रांतीनंतर अनेक सामाजिक संकल्पना बदलल्या, तशी पैसा व तो मिळविणाऱ्याकडंं पाहण्याची दृष्टीही बदलली. या क्रांतीनं दोन पारंपरिक

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२४४