पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बच्याचदा असंही होतं की, अधिकारांचं विकेंद्रीकरण करता करता ते करणार्याच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे तो केवळ नावालाच वरिष्ठ राहतो. म्हणूनच व्यवस्थापकाला हा समतोल व्यवस्थित साधता आला पाहिजे. ही बाब वाटते तितकी सोपी नाही. हे कौशल्य विकसित करण्यासाठी व्यवस्थापकाला बरेच परिश्रम घ्यावे लागतात.
 अधिकार मिळालेल्या व्यक्तीची आणखी एक समस्या म्हणजे आपल्या तसंच अन्य विभागांतील घडामोडींची माहिती मिळवणं ही असते. ही माहिती बहुतेक वेळा कनिष्ठ कर्मचार्याकडूनच मिळत असते. वरिष्ठाला आवडेल अशीच माहिती देण्यात कनिष्ठाचा कल असतो. यामुळे खरी माहिती मिळणे अनेकदा शक्य होत नाही. हुकूमशाही प्रवृत्तीच्या व्यवस्थापकांची याबाबतीत दिशाभूल होण्याची शक्यता जाई असते.
खुशमस्करी:
 जितकी सत्ता अवतीभोवती खुशमस्कर्यांची वर्दळही अधिक. अशांना 'चमचा' हे लोकप्रिय नाव आहे. प्रत्येकाच्या मनात चमच्यांबद्दल राग असतो. पण चमचेगिरी निपटून काढण्याचे फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.कारण उभयपक्षी गरज असते.
 गुळाभोवती माशा घोंघाव्यात तसे चमचे सत्ताधीशांभोवती रूजी घालत असतात. ते सत्ताधीशाचा अहंकार सुखावत असल्याने त्यांच्यावर कितीही टीका झाली तर ते दूर केले जात नाही. कारण सत्तास्थान जितकं वरचं तितका सत्ताधीश एकाकी असतो. व ते स्थान मिळविण्यासाठी स्पर्धाही तीव्र असते. या स्थितीत स्वत:चं मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी चमचे ही त्याची मानसिक गरज असते. चमचेगिरीमुळेही काही अवांंतर फायदे होत असल्याने माणसं ती करण्यासाठी उद्युक्त होतात.
 चमच्यांना एक व्यवहारी फायदाही असतो. ते अवतीभोवतीची बितंबातमी वरिष्ठांपर्यंत पोहचवितात. त्याला वेळीच सावधही करतात.जी माहिती अधिकृत मार्गाने मिळणार नाही, ती चमच्यांमार्फत सहजपणे हाती येते. कारण त्याच्या हातात आहे. तोपर्यंत आपली सही टिकून राहील याची चमच्यांना जाणीव असते. अधिकार्याला धोरण ठरविताना या माहितीचा उपयोग होतो.
 चमच्यांच्या आहारी न जाता त्यांच्याकडून मिळणाच्या माहितीचा उपयोग करून घेण्याचा चाणाक्षपणा व्यवस्थापकानं दाखविला पाहिजे. तसं केल्यास चमचेगीरीसारख्या एरवी टीकेचा विषय असणाच्या बाबीचाही सकारात्मक उपयोग करून घेेता येतो.
संस्थेतील गटबाजी :

 अमुक संस्था गटबाजीने पोखरली आहे असं अनेकदा आपल्या कानावर येत

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२४२