पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२५०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सत्ता


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

नुष्यबळ व्यवस्थापनाची तीन प्रमुख सूत्रं आपण. मागच्या लेखात पाहिली. कोणत्याही व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकाकडे सत्ता असण आवश्यक आहे. मात्र सत्ता हे दुधारी शस्त्र आहे.तिचा उपयोग सकारात्मक केल्यासच तो संस्था, व्यवस्थापन व कर्मचारी यांना फायद्याचा ठरू शकतो. सत्तेचा वापर करतानां व्यवस्थापकाला पुढील तीन बाबींचा मोह होऊ शकतो.

 १. अधिकारांच्या गैरवापराचा मोह
 २. खुशमस्करीचा मोह
 ३. गटबाजीचा मोह
अधिकाराचा गैरवापर:
 अधिकार हातात आला की, तो टिकविण्यासाठी त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.याचा फटका कनिष्ठ कर्मचाच्यांना बसतो. या भैरवापराला उघड विरोध करण्याचं धाडस कनिष्ठांनी दाखविलं नाही, तरी अशा व्यवस्थापकाला ते मनापासून सहकार्य करीत नाहीत. आपल्या अधिकारातील विभागाची सर्व कामं व्यवस्थापक स्वत: करू शकत नाहीत.त्याला कनिष्ठ कर्मचाच्यांवर अवलंबून राहावं लागतंच त्यांनी केवळ ‘सांगितलेले काम करणे’ हे ध्येय ठेवल्यास व्यवस्थापकाचीच अडचण होते त्यामुळे आपल्या अधिकारांत कानिष्ठांंनाही वाटेकरी करून घेणे हा अधिकारांचा वापर करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे.यामुळे आपोआपच जबाबदाऱ्यांंचेही विकेंद्रीकरण होतं आणि व्यवस्थापकाचे काम सोपे होते. आपला व्यवस्थापक हुकुमशहा ' नाही ही भावना निर्माण झाली की कनिष्ठ कर्मचारीही स्वतःच्या पुढाकाराने अनेक कामं बिनबोभाट करतात .स्वतःच्या अडचणी न घाबरतो मांडू शकतात. मोकळ्या वातावरणामळे विभागाची कामगिरी अधिक सुधरते असा अनुभव आहे. मात्र, अधिकाराचं विकेंद्रीकरण कसं आणि किती प्रमाणात करावं .हे व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून आहे.

 आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा नेमका उद्देश कोणता आहे याची सुुक्षम जाणीव व्यवस्थापकाला असेल तर तो या अधिकारात कुणाला, किती प्रमाणात आणि कसं वाटेकरी करून घ्यावयाचे याचा आडाखा अचूकपणाने बांधू शकतो. अन्यथा

मानवबळ व्यवस्थापन आणि सत्ता /२४१