पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२३७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थांच्या समस्यांवरील उपाययोजना


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

ल्या लेखात संस्थांच्या समस्यांच निदान व्यवस्थापकीय सल्लागारांनी कसं करावं या बाबत आपण माहिती घेतली. निदानानंतरची पायरी म्हणजे उपाययोजना,याच पायरीवर सल्लागार आणि संस्था यांच्यात मतभेद किंवा विवाद होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे पुढील दोन मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

 १. संस्थेचा प्रामाणिकपणा व सल्लागारावरील विश्वास
 २. सल्लागाराचा प्रामाणिकपणा व संस्थेवरील विश्वास.
 रोगनिवारण केवळ चांगल्या औषधानेच होतं असं नाही. तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील परस्पर विश्वासाचाही त्यात भाग असतो. डॉक्टरने सांगितलेली औषधे रुग्णानं सूचनेबरहुकूम घेतली पाहिजेत. तिथं आपलं ज्ञान (असलेलं किंवा नसलेलं)अथवा तिसऱ्याच कुणाच्या सल्ल्यानं वागता कामा नये. खाण्यापिण्याच्या पथ्याबरोबरच हे पथ्य पाळणं महत्त्वाचं आहे.
 संस्थांच्या समस्यांबाबतही हेच सूत्र लागू आहे. याखेरीज संस्थेचं रोगनिवारण करताना सल्लागाराला एका खास समस्येला तोंड द्यावं लागतं. ती म्हणजे संस्थेतील राजकारणं. बऱ्याचदा असं होतं की, संस्थेतील एखाद्या अधिकाऱ्याला संस्थेतल वजन वाढवायचं असत. करावडैल्लागरने त्याकरिता सल्लागाराने आपल्याला सहकार्य करावं अशी त्यांची इच्छा असते. त्याने स्वत: मनाशी काही योजना बनविलेली असते.सल्लागाराने त्यानुसार सल्ला द्यावा असं त्याला वाटत. थोडक्यात सल्लागाराकडे दुय्यम भूमिका देऊन त्याच्या नथीतून शरसंधान करण्याचा त्याचा बेत असतो. त्याची फायद्याची उपाययोजना त्याने स्वत: संस्थेसमोर मांडली तर त्याच्यावर स्वार्थीपणाचा शिक्का बसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची उपाययोजना त्याच्या सल्लागाराकडून तोंडून वदवून घ्यायची असते. यासाठी तो साम, दाम, दंड व भेद या चारीही मार्गांनी सल्लागारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो.

 काही वेळा असंही होतं की, सल्ल्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे असा काही 'गुप्त कार्यक्रम' असत नाही. तरीही अन्य कारणांस्तव त्याला सल्लागाराची उपाययोजना

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२२८