पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


येणंं आवश्यक आहे. उच्च पदांच्या जाहिराती विशेष केल्या जात नाहीत. त्यामुळंं आपण स्वतःच अन्य कंपन्यांच्या व्यवस्थापकांबरोबर संपर्क ठेवणे श्रेयस्कर ठरतंं.
 आपण आपल्या कामात हुशार असला तरी अन्य कंपन्यांच्या लक्षात आपली हुशारी येईलच असे नाही. त्यामुळंं त्या कंपनीकडून आपल्याला बोलावणं येण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळंं व्यावसायिक संस्था, व्यवस्थापक संस्था किंवा सार्वजनिक संस्थांचं सदस्यत्व स्वीकारणं अणि अशा संस्थांमध्ये संधी मिळताच स्वतःच्या व्यावसायिक क्षमतेचं प्रदर्शन केल्याने आपला उद्देश साध्य होऊ शकतो. अशा संस्थाही त्यांच्या कार्यासाठी वेळ देऊ इच्छिणाच्या व्यक्तींच्या शोधात असतात.
प्रतिमा तयार करणे :
 केवळ स्वतःची जाहिराताबाजी केल्यानं कार्य साधतेच असंं नाही तर त्यासाठी स्वतःची विशिष्ट प्रतिमा जनमानसात तयार करावी लागते. ती तयार करण्यासाठी आपल्याला वेळेबरोबरच पैशाचीही गुंतवणूक करावी लागण्याची शक्यता असते.आपल्या व्यावसायिक क्षमतेची जाहिरात करणं, विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवास करणं, व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये आपले विचार मांडणं, वृत्तपत्रांमधून विवक्षित विषयांवर लेख आदी लिहिणंं इत्यादी उपक्रमांद्वारे आपली प्रतिमा निर्माण करता येते. हे करण्यासाठी पैसा खर्च होत असला तरी तो वायफळ खर्च नसतो. तर ती एक प्रकारची गुंतवणूकच असते.त्याचबरोबर हेही लक्षात ठेवणंं आवश्यक आहे, की प्रतिमा निर्माण करण्याचं कार्य अल्पावधीत होत नाही. त्यासाठी काही महिनेच नव्हे तर कित्येकदा काही वर्षेही प्रयत्न करावे लागतात.
 एकंदरीत व्यावसायिक मंडळींमध्ये स्वतःचा राबता ठेवणंं, उच्च्पदास्थांबरोबरच्या ओळखी वाढविणं, आपली क्षमता आणि ज्ञान यांच्या दृष्टीसमोर राहील अशा तऱ्हेचे प्रयत्न करणं आणि आपली उपयुक्तता जाहीर करणं या मार्गानंं आपली प्रतिमा तयार होऊ शकते.
पर्यायी मार्ग :
 नोकरी बदलू पाहणाऱ्या कित्येक अधिकाऱ्यांना हे पारंपारिक मार्ग पसंत नसतात.केवळ गुणवत्तेचं प्रदर्शन करून नवी नोकरी मिळविणं हे भारतासारख्या देश शक्य नाही, कारण भारतात अजून व्यावसायिक व्यवस्थापन ही संकल्पना दृढ झालेली नाही. तिचा उच्चार केवळ सभा आणि चर्चामध्येच केला जातो. प्रत्यक्षात व्यक्तिगत संबंधावरचनोकरी मिळणंं किंवा न मिळणंं अवलंबून आहे असं त्यांचंं मत आहे.

 असे अधिकारी व्यावसायिक कार्यात वेळ गुंतविण्यापेक्षा समाज कार्यांत

नवी नोकरी स्वीकारताना/२१८