पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवी नोकरी स्वीकारताना...


पल्या सध्याच्या नोकरीत आपण समाधानी नसाल तर काय केलंं पाहिजे हा एक महत्वाचा प्रश्न आहे. नवं आणि सध्यापेक्षा चांगलं अन्य काम मिळविणं सोपं नाही. विशेषत: उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तर ते फारच कठीण आहे. त्यामुळंं त्यांच्यासाठी दीर्घकालीन आणि निश्चित धोरण आखावं याचा विचार या लेखात आपण करणार आहोत.

 हे धोरण आखताना पुढील मुद्यांवर लक्ष द्यावं.
 १.वेळेची ‘गुंतवणूक'
 २.स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवणंं
 ३.स्वतःची प्रतिमा निर्माण करणं
वेळेची गुंतवणूक :
 नवी नोकरी मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पूर्वतयारीची ही पहिली पायरी आहे. प्रत्येक कंपनीची स्वतःची अशी कार्यपध्दती असते. अन्य कंपनीतून अचानकपणे आलेली व्यक्ती ही कार्यपध्दती झटकन आत्मसात करू शकत नाही. तसंच एका कंपनीत मिळालेला कार्यानुभव दुसऱ्या कंपनीत उपयोगी पडेलच असे नाही. याच टप्प्यावर वेळेच्या ‘गुंतवणुकी'ची आवश्यकता भासते.
 त्यामुळंं नव्या कामाचा शोध घेण्याअगोदर आपल्या ज्ञानाची व्याप्ती वाढविणं आणि त्यासाठी वेळ खर्च करणंं आवश्यक आहे. समाधान न देणाऱ्या कामात अखंड गुंतून न पडता, निदान फावला वेळ आपलं ज्ञान वाढविण्यासाठी आणि अन्य कंपन्यांमधली कार्यपध्दती जाणून घेण्यासाठी वापरला पाहिजे. असं केल्यास नव्या ठिकाणी आपण लवकर जुळवून घेऊ शकाल.
लोकांसमोर राहणं :

 बरेच सक्षम कर्मचारी प्रसिध्दी पराङ्मुख असतात. एरवी हा गुण समजला गेला तरी अशा वृतीचा तोटाही होऊ शकतो. त्यामुळे नवं काम स्वीकारण्याचा विचार करणाऱ्या कर्मचाऱ्यानं,विशेषतः उच्चपदस्थ अधिकाऱ्याने योग्य मार्गानंं लोकांसमोर

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२१७