पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्याचा सामाजिक संपर्क सुटतो. त्यामुळंं त्याची चडफड होते.
 या दोन्हीपैकी कोणताही अनुभव आल्यास अधिकाऱ्याने स्वतःची घुसमट होऊ देेण्यापेक्षा पर्यायी नोकरीचा शोध श्रेयस्कर ठरतंं. कारण अशा तणावग्रस्त वातावरणामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
आपल्या कामाचं समालोचन:
 कामाचं समालोचन करताना स्वतःला पुढील तीन प्रश्न विचारावेत.
 आपल्या कामाला लागणारा नेमका वेळ किती?
 या नोकरीत माझे भवितव्य काय?
 ही नोकरी आपल्या क्षमतेला साजेशी आहे काय?
नोकरीच्या वेळेचं मूल्यमापन :
 वेळ हा पैशाप्रमाणंं असतो. कितीही असला तरी तो कमीच वाटतो. तसंच एकाच ठिकाणी तो खर्च केला तर अन्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी शिल्लक उरत नाही.
 अन्य कुणाहीप्रमाणं व्यवस्थापकाजवळही दिवसाचे २४ तासच उपलब्ध असतात. यातील बहुतांशी वेळ नोकरीसाठीच खर्च केला,तर अन्यत्र त्याची 'गुंतवणूक’ करणं अशक्य बनतं. पैशाप्रमाणेच वेळ हीदेखील संपत्ती आहे, हे व्यवस्थापकानं लक्षात घेतलं पाहिजे व त्याची नोकरी आणि इतरत्र गुंतवणूक समतोल पद्धतीने केला पाहिजे. घरदार, बायको, मुलं, स्वतःचे छंद, नव्या गोष्टी शिकणं, थोडी फार कमरणूक, नवे अभ्यासक्रम, पदव्या इत्यादी प्राप्त करणंं यासाठीही नोकरी व्यवस्थित सांभाळून वेळ शिल्लक ठेवता येतो आणि ही गुंतवणूक फायद्याची ठरते हे जरूर लक्षात ठेवलं पाहजेे. नुसतं काम एक काम केल्याने, आपली कामावरील निष्ठा सिध्द होईल, पण दीर्घकालीन विचार करता ते तोट्याचं ठरते.
नोकरीतलं भवितव्य :
 सध्याच्या नोकरीत आपलं भवितव्य काय याचाही गंभीरपणाने विचार करणं आवश्यक आहे.काही कामं अत्यंत आकर्षक असतात, पण ती अल्पजीवी असतात. ती कर्मचाच्यांच्या भवितव्याला निश्चित आकार देण्यास असमर्थ असतात. त्यातून काम केल्याचे समाधानही मिळत नाही.
आपल्या क्षमतेचं समालोचन:

 घरच्या परिस्थितीमुळे कित्येक प्रज्ञावंत व असामान्य क्षमता असणाऱ्यांंनाही शिक्षण संपल्याबरोबर मिळेल ती नोकरी करून चरितार्थाची सोय करावी लागते. तर काही जण केवळ पगार आकर्षक आहे, म्हणून स्वतःचा कल, किंवा आवडनिवड यांचा विचार न करता अशी नोकरी धरतात. कालांतराने ती आपल्या क्षमतेच्या अनुकूल नाही

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/२१५