पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२२३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काम व क्षमतेचंं समालोचन


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

प्रत काळात नोकरीकडं कशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे याबद्दल आपण मागच्या लेखात विचार केला. नोकरीप्रमाणे ज्या ठिकाणी ती केली जाते, तेथील वातावरण हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा असतो. कंपनी मोठी आहे, तेथील नोकरीही आकर्षक आहेतरीही वातावरण अनुकूल नसल्याने कित्येक व्यवस्थापकांनी तिच्यावर पाणी सोडल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे वातावरणाचं समालोचन करणे योग्य ठरत. हे समालोचन करताना पुढील प्रश्न स्वत:ला विचारून पाहावेत.

 १. आपल्यावर नको इतका दबाव किंवा तणाव तर नाही ना?
 २. आपल्या प्रगतीत मुद्दाम अडथळे आणून ती रोखली तर जात नाही ना?
तणावग्रस्त वातावरण :
 कोणत्याही व्यवस्थापकीय कामामध्ये तणाव हा असतोच. तथापि, काही कंपन्यांमध्ये आपल्या मर्जीतील नसलेल्या अधिकाच्यांवर संचालकांकडून किंवा व्यवस्थापनाकडून अतिरिक्त तणाव आणला जातो. जेणेकरून त्याला काम करणे अवघड व्हाव. तो पुढील कारणांमुळे येऊ शकतो.
 १. बिघडलेले औद्योगिक संबंध.
 २. असमंजस वरिष्ठ अधिकारी
 ३. कंपनीतील अंतर्गत राजकारण
 नको असलेल्या अधिकाच्यांचा पत्ता परस्पर काटण्याचे दोन मार्ग काही ठिकाण संचालकांकडून अवलंबले जातात. एक, त्याला अगदी कमी काम देणे किंवा त्याच्यावर कामाचा प्रचंड बोजा टाकणे. अशा अधिकाच्याला व्यवसायाशी संबंधित सम्मेलनंं, अधिवेशनं, परिसंवाद इत्यादी सामाजिक कार्यक्रमांत कंपनीच्या वतीने भाग घेऊ दिला जात नाही.

 दुसरा उपाय म्हणजे त्याच्यावर कामाचा इतका भार टाकला जातो ,की स्वतःचंं कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याकडेही लक्ष देणे त्याला अशक्य होतं. कामाव्यतिरिक्तचा

काम व क्षमतेचं समालोचन/२१४