पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग दुसरा)

ढता व्यापार आणि तांत्रिक प्रगती यामुळं जग जवळ येत चाललं आहे. विविध पा मानवसमूहांना एकमेकांपासून दूर करणाऱ्या भिंती ढासळत आहेत. सीमाविरहित जगाच्या दिशेनं आपला प्रवास सुरू झाला आहे. अशा जगातील व्यवस्थापनाला कोणती आव्हानं पेलावी लागतील व ती कशी पेलता येतील याचा विचार आपण मागच्या लेखापासून करीत आहोत. व्यवस्थापक हे सर्वसामान्य नागरिकांमधूनच निर्माण होत असल्यानं त्यांच्यात समाजात असणारे सर्व गुणदोष सामावलेले असतात. या गुणदोषांचं प्रतिबिंब त्यांच्या व्यवस्थापकीय कामगिरीतही पडलेलं असतं. जात, प्रांत, वंश, रंग इत्यादी भेदाभेदांपासून तेही सामान्य माणसाप्रमाणं पूर्णपणे मुक्त नसतात. हे खरं असलं तरी कोणत्याही क्षेत्रातील व्यवस्थापकांवर असणारी जबाबदारी सर्वसामान्य नागरिकांपेक्षा वेगळी व अधिक असते. जगरहाटीप्रमाणं चालायचं ही सर्वसामान्यांची जीवनशैली असते. तर येणाऱ्या काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणं धोरण आखायचं ही जबाबदारी व्यवस्थापकांची असते. त्यात यशस्वी होणारे व्यवस्थापक आपली संस्था व स्वतःचा विकास साधू शकतात. व्यवस्थापक लहान संस्था की मोठ्या, त्याला सर्वसामान्यांप्रमाणे प्रवाहतपतित असून चालत नाही.

 त्यामुळं सीमाविरहीत जगाकडं आपली वाटचाल चालली असताना व्यवस्थापकांवर नवी आणि अधिक अवघड जबाबदारी येऊन पडली आहे. एकेकाळी स्वतःच्या संरक्षणासाठी निर्माण केलेल्या भिंती आता आर्थिक व सांस्कृतिक विकासाला अडथळे ठरत आहेत. त्यामुळं त्या तोडण्याची सुरुवात व्यवस्थापकांपासून व्हायला हवी. केवळ आपला समाज, जात, भाषा, राज्य, प्रांत यांच्या पलीकडे पाहण्याची मानसिकता विकसित होणं आवश्यक आहे. या भिंती २१ व्या शतकात कुचकामाच्या ठरत आहेत.

 विज्ञानामध्ये दोन प्रकारचे जोर महत्त्वाचे मानले जातात. एक बहिर्गामी (सेंटिफ्यूगल फोर्स). या जोरामुळं वस्तू केंद्रस्थानापासून दूर फेकल्या जातात. तर दुसरा केंद्रगामी जोर. या मुळं वस्तू केंद्राकडं आकर्षिक होतात. मानवी मनावरही अशाच प्रकारचे दोन सामाजिक जोर कार्य करीत असतात. त्यामुळं समाज आत्मकेन्द्री व बहिर्मुख अशा दोन गटात विभागला गेला आहे. याच विभागांचे आणखी उपविभाग

सीमाविरहित जगातील व्यवस्थापन (भाग २) (२०६)