पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जातं.'
 वरील दोन्ही उदाहरणं सेवा घेणं आणि सेवा देणं याच्याशी संबंधित आहेत. सेवा हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. सेवेमुळे देणारा आणि घेणारा असे दोघेही सुखी बनतात. तरी अनेकांच्या बाबतीत ती देणं आणि घेणं ही एक समस्या असते. याची पुढील चार कारणं आहेत.
 १.परंपरा आणि संस्कृतीमुळे निर्माण होणारी अडचण.
 २.अधिकार गाजविण्याची वृत्ती
 ३.एकाधिकारशाही
 ४.संवाद कौशल्याचा अभाव
 कोणत्याही संस्थेच्या, विशेषत: जे सेवा उद्योग म्हणून गणले जातात, त्यांच्या व्यवस्थापनात या सेवाभावाचं महत्व अनन्यसाधारण आहे. हॉटेलं, बैंक, रुग्णालयं, सल्लागार केंद्र अश्यासारख्या सेवा उद्योगामध्ये कार्य करणाच्या व्यवस्थापकांचं मूळ भांडवल सेवाभाव हेच आहे. खरं तर सेवा देणं आणि सेवा घेणं यांचा उत्कृष्ट ताळमेळ साधन्यातूनच व्यवस्थापकाचं कौशल्य सिद्ध होत असतं. व्यवस्थापाकाला आपल्या कनिष्ठांकडून सेवा घ्यावी लागते. व आपल्या वरिष्ठांना आणि संस्थेच्या ग्राहकांना सेवा द्यावी लागते. त्यामुळं ‘सेवे'मध्ये येणाच्या वर दिलेल्या चार अडवणींचा विचार व्यवस्थापकानं करणं आवश्यक ठरत.
सेवा आणि परंपरा : भारतापुरतं बोलायचं तर आपल्या परंपरेत सेवेचं स्थान सवोच्च आहे. ईश्वरसेवा, मानवसेवा इतकंच नाही तर सर्वच सजीवांची सेवा करावी असं आपली संस्कृती सांगते. मात्र, भारतीय समाजात जातिभेद रुजल्यानंतर सेवेच स्वरूप बदललं सेवा दोन तन्व्हेनं दिली आणि घेतली जाऊ लागली. एक, उच्चभ्रू सेवा जी उर्मटपणानं दिली जाते आणि विनम्रपणानं स्वीकारली जाते. दोन, कनिष्ठ सेवा जी विनम्रपनानं दिली जाते आणि उर्मटपणानं स्विकारली जाते. लेखाच्या सुरुवातीला मी सांगितलेले दोन प्रसंगी हे दुसच्या प्रकारात मोडतात.
 श्रीमंत लोक (काही अपवाद वगळून) गरिबांना दानधर्म करतात. त्यात गरिबांचा फायदा करून देण्यापेक्षा स्वतःची प्रसिध्दी आणि अधिकार गाजवण्याचा हेतू अधिक असतो. तुझा कर्ताकरविता मी आहे, हे दान घेणाच्याला जाणवून दिलं जातं हे पहिल्या प्रकारच्या सेवेचं उदाहरण आहे. कोणत्याही संस्थेत विशेषतः सेवा उद्योगात काम करनार्या व्यवस्थापकाची सेवावृत्ती या दोन्ही पध्दतीची नसावी.

अधिकार गाजविण्याची सवय : व्यवस्थापन हे अधिकार व जबाबदारी यांचं एकजीव मिश्रण आहे. व्यवस्थापकाला एकाच वेळी अधिकारांची पूर्तता करणं म्हणजे सेवा घेणं आणि जबाबदार्यांची पूर्तता करणं म्हणजे सेवा देणं ही काम करावयाची

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /२०१