पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२०१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कंपनीला बँक थोङंंच कर्ज देईल? कर्जदाराकडे स्वतःचा पैसा नसेल तर बँक त्याला कोणतीही सहानुभूती दाखविणार नाही.'मी म्हणालो. तेही त्यांना पटलं. कंपनीची मूल्यवृध्दी काही प्रमाणात राखून ठेवली पाहिजे. त्यामुळंं कंपनीची पत वाढून कर्ज मिळणंं सोपंं होईल असंं नंतर त्यांनी मान्य केलं.
 त्यानंतरच्या चर्चेत कामगार नेत्यांनी असे मुद्दे मांडले की, ते कामगारांचे पुढारी आहेत की व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आहेत. असा प्रश्न कुणालाही पडला असता.ते म्हणाले, ‘कंपनीच्या अस्तित्वासाठी आणि प्रगतीसाठी आधुनिकीकरण आणि विस्तार आवश्यक आहे. कारण त्यामुळंं कंपनीचा व्याप वाढून कर्मचाच्यांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील. आधुनिकीकरण व विस्तार न करणाच्या अनेक कंपन्या बंद पडलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. अशा बंद पडलेल्या कंपन्यांतील कर्मचाच्यांचे काय हाल होतात, हे आम्हाला माहीत आहे. तेथील व्यवस्थापकांना सहा महिन्यांच्या आत नवी नोकरी मिळाली. मात्र ८० टक्के कामगार रस्त्यावर आले. कंपनीकडून मिळालेली नुकसानभरपाई किती दिवस पुरणार? ती खर्च झाल्यावर ते देशोधडीला लागले. आमच्या कंपनीवर आणि आमच्यावर ती पाळी येऊ नये. यासाठी मूल्यवृध्दीतील मोठा वाटा आधुनिकीकरण व विस्तारासाठी राखून ठेवला पाहिजे.
 कंपनीचा फायदा म्हणजेच मूल्यवृध्दीचे अनेक वाटेकरी असतात. त्यातील काही वाटा कामगारांना हवा असतो. व्यवस्थापन, कार्यालयीन कर्मचारी इत्यादी उच्च स्थानांपासून ते निम्नस्थानांपर्यंतचे सर्वच जण आपापला हिस्सा मागत असतात. मूल्यवृध्दी अधिक असल्यास त्यांची मागणीही वाढते. ही केवळ पगाराचीच मागणी नसते, तर आपापल्या विभागांमध्ये सुधारणा, विस्तार व क्षमतावाढ करण्यास प्रत्येकाला पैसा हवाच असतो. या सर्व खर्चाचा स्रोत केवळ एकच असतो तो म्हणजे मूल्यवृद्धी.
 कंपनीच्या सर्व विभागांची एकूण मागणी या मूल्यवृध्दीच्या दुपटीहून अधिक असू शकते. तिचंं वाटप करण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर असते. मागणारा व वाटणारा यांच्यात तडजोड होणं बच्याचदा कठीण होतंं आणि त्यातूनच कामगार विरिध्द व्यवस्थापन असा संघर्ष निर्माण होणं अनिवार्य असतं.
 एवढंं सांगून मी म्हणालो, 'हा तिढा सोडविण्याचे दोन उपाय आहेत. समजा एका व्यक्तींने एक निर्णय घेतला. तो दुसच्याला पसंत पडला नाही अशा स्थितीत दोहोंपैकी कुणीतरी एकच बरोबर आहे. याचा एकदा निर्णय झाला की, जे बरोबर आहे त्याचीच अमलबजावणी झाली पाहिजे हा एक पर्याय आहे.

 माझ्या म्हणण्याचा अर्थ त्यांनी योग्य पध्दतीनं समजावून घेतला. कुठंं तरी आपल्याला तडजोड केली पाहिजे. बोनसचा विचार आम्ही पुढच्या वेळी करू. सध्या

मूल्यवृदी, व्यवस्थापन व कर्मचारी/१९२