पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/२००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मूल्यवृध्दी, व्यवस्थापन व कर्मचारी


मगार नेत्यांच्या मनुष्यबळ विकासासंबंधी सिंद्री खत कारखान्यात मी केलेल्या अभिनव प्रयोगाबाबत मागच्या लेखात सांगितलं आहे. दुसरा प्रयोग मी किर्लोस्कर कमिन्स कंपनीत केला.

 या कारखान्यात १२०० कामगार होते. त्यापैकी आम्ही कार्यशाळेसाठी १२० जणांची निवड केली. ही कार्यशाळा इतकी प्रभावी झाली की, सर्व कामगारांसाठी ती आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 येथेही मी कामगार नेत्यांसाठी कार्यशाळा घेतली. मी त्यांना मूल्यवृध्दीचं तत्वज्ञान समजावून दिलं. कर्मचाच्याच्या कामामुळंं कंपनीला आर्थिक प्राप्ती होते. याच आर्थिक प्राप्तीतून कर्मचाऱ्याना पगार व इतर लाभ दिले जातात. कर्मचाच्याचे काम जितकं अधिक आणि अचूक तितका कंपनीला लाभ अधिक होतो. यालाच 'मूल्यवृध्दी' म्हणतात. नेत्यांना हा मुद्दा लगेच पटला.
 `आता या मूल्यवृध्दीचं करायचं काय?’ असा प्रश्न मी त्यांना विचारला. काय करायचं म्हणजे? कर्मचाच्यांच्या पगारात वाढ व्हायला हवी. त्यांना अधिक अनुलाभ आणि भत्ते मिळायला हवेत. त्यासाठी ही मूल्यवृध्दी खर्च करावी लागेलं असं ठराविक उत्तर त्यांनी दिलं. मी विचारलं, `मूल्यवृध्दी खर्च करण्याचा हा एक मार्ग झाला. कामगारांच्या पगारात वाढ करायची तर कार्यालयीन कर्मचारी आणि व्यवस्थापकीय आधिकारी यांनाही वाढीव फायदे द्यावे लागतील. कारण मूल्यवृध्दीत त्यांचंंही योगदान आहे. मग कंपनीने सर्व मूल्यवृध्दी कर्मचाच्यांकरिता खर्च करावी का?
 ते हो म्हणतील अशी माझी कल्पना होती. पण कामगारांचे नेते असूनही ते स्वत:हून म्हणाले, ‘सर्व मूल्यवृध्दी कर्मचाच्यांवर खर्च करून चालणार नाही. कारखान्याचंं आधुनिकीकरण करणंं आवश्यक आहे. त्यासाठी काही पैसा राखून ठेवणंं आवश्यक आहे. पण थोड्या वेळानंं त्यांची चलबिचल झालेली दिसली. ‘आधुनिकीकरणासाठी आपण पैसा बँकेकडून घेऊ शकतो ना?’ असं त्यांनी विचारलं.

 पण बँक कुणाला कर्ज देते? ज्याच्याजवळ पैसा असतो त्यालाच. कफल्लक

अदभूतदुनिया व्यवस्थापनाची १९१