पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संकल्पना प्रभावीपणे मांडली. प्रत्येकाच्या म्हणण्याचा आशय साधारण सारखाच होता तो म्हणजे ‘कंपनी डंबघाईला ओली आहे आणि त्याला व्यवस्थापन जबाबदार आहे'.
 मी सर्वांचं म्हणणं शांतपणानं, अजिबात विरोध न करता ऐकून घेत होतो. त्यांच्या भाषणानंतर मी विचारलं, ‘तुमच्या म्हणण्यानुसार कंपनीची अधोगती होत आहे. ती अशीच व्हावी असं तुम्हाला वाटतं का?
 'नाही, नाही. कंपनी चालली पाहिजे अशी आमची इच्छा आहे.' प्रत्येक जण म्हणाला. ‘कंपनी चालायची असेल, तर केवळ व्यवस्थापन चालवू शकेल का ? कामगारांनी काही योगदान नको का करायला?' असं मी पुढे विचारलं.
 माझ म्हणणंं त्यांना पटलं. व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी कारखान्याची परस्थिती सुधारण्यासाठी एकत्रितपणे काम केलंं पाहिजे असंं ते म्हणाले. नंतर मी पुन्हा पूर्वाप्रमाणं पाच-पाचचे गट केले कारखान्याच्याा उन्नतीसाठी व्यवस्थापनानं केल्याच पाहिजेत अशा पाच आणि कर्मचाच्यांनी केल्या पाहिजेत अशा पाच बाबी लिहिण्यास प्रत्येक गटाला सांगितलं.
 व्यवस्थापनानं काय केले पाहिजे हे सर्व गटांनी त्वरित लिहून काढलं .पाचापेक्षा जास्त मुद्दे मांडण्यात आले. मात्र, कर्मचाच्यांनी काय केले पाहिजे,यावर त्याच्यात बरीच चर्चा सुरू झाली. कारण आपण जे लिहू ते आपल्याविरुध्दच वापरलंं जाईल,अशी भीती त्यांना वाटत होती.
 'कागदावर नावंं लिहू नका. तुम्हाला जे काही मांडायचं ते निर्भडपणे मांडा. ते गुप्त राहील याची मी हमी देतो.’ असे सांगितल्यावर त्यांनी मुद्दे लिहिले.ते मी वाचले.त्यात पगारवाढ करावी, भते, अनुलाभ अधिक द्यावेत, इत्यादी नेहमीच्या मागण्या तर होत्याचपण, पण आश्चर्य म्हणजे नवं तंत्रज्ञान आणावं, आधुनिकीकरण करावं, उत्पादनांमध्ये विविधता आणावी असे मुद्देही होतेे.आधुनिकीकरणाला कामगारांचा विरोध असतो.असा माझा अनुभव होता. पण इथं त्यांच्या पुढाच्यांनीच ही मागणी केली होती.
 कर्मचाच्यांनी काय करावं या संबंधीही त्यांनी माझ्या अपेक्षेला धक्का देणारे मुद्दे उपस्थित केले होते. कामगारांनी शिस्तीचे पालन करावे आणि उत्पादन क्षमता वाढवावी,असं त्यांचे पुढरीच म्हणत होते.
 याखेरीज व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या परस्पर संवाद व सहकार्य हवं असंही मत सर्वांनी व्यक्त केलं.
 त्यांनी लिहिलेल्या मार्गांवर मी नंतर त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. सर्वप्रथम पगारवाढीचा

मुद्दा घेतला. कर्मचार्यांपेक्षा व्यवस्थापकांना पगार अधिक मिळतो याचं त्यांना वैषम्य वाटत .मी होते . मी विचारलं‘कर्मचाच्यांना पगार कोण देतं?’ सर्वांनी सांगितलं की, आम्हाला व्यवस्थापनाकडून पगार मिळतो.’

अदभूत दुनिया व्यवस्थापनाची/१८९