पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कामगार नेते आणि मनुष्यबळ विकास


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

ऱ्याच वर्ष्यापुर्वी सिंढी येथील खते कारखान्यात 'कार्य नैतिकता आणि कार्य संस्कृती' या विषयांवर मी कार्यशाळा घेत होतो. कार्यशाळेला नेहमीप्रमाणं कनिष्ठ आणि मध्यम स्थानांवर काम करणारे ‘व्यवस्थापक उपस्थित होते.कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकानं ‘कार्यशाळा उत्तमच झाली, पण त्याचा काही उपयोग होणार

नाही. कारण कार्यसंस्कृती कर्मचार्यांमध्ये रुजली पाहिजे. पण जोपर्यंत कर्मचारी आणि त्यांचे पुढारी हे समजून घेणार नाहीत तोपर्यंत असे कार्यक्रम वायाच जातील'अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
 आपण अशीच कार्यशाळा कामगार पुढान्यांसाठी घेऊ शकाल का? असं कार्यक्रमाच्या आयोजकांनी मला नंतर विचारलं. ही कल्पना नवीन होती. मी ते आव्हान ‘स्वीकारायचं ठरवलं.
 पहिल्या कार्यशाळेनंतर माझ्या लक्षात आलं की, कामगार पुढान्यांना नुसती व्याख्यानं देऊन काहीच साध्य होणार नाही. मग मी एक वेगळाच प्रयोग केला.मी पाच पुढन्यांचा एक गट केला आणि सिंड्री खत कारखान्याची आजची स्थिती व दहा वर्षांनंतरची स्थिती अशा दोन विषयांवर चित्र किंवा व्यंगचित्र काढण्यास प्रत्येक गटाला सांगितलं. चित्रात फक्त रेखांकन असाव, आकडेवारी किंवा आलेख असू नये अशी सूचनाही केली. कामगार पुढाच्यांच्या दृष्टीनं तो कारखाना आज कसा आहे व दहा वर्षांनंतर कसा असणार आहे हे मला जाणून घ्यावयाचं होतं.
 माझ्याकडे दोन प्रकारची एकूण चार चिंत्र आली. एका चित्रात छोट्या रोपट्याचा मोठा वृक्ष झालेला दाखविण्यात आलेला होता. तशाच प्रकारच्या दुसऱ्या चित्रात दिवटीचा सूर्य झालेला दाखविण्यात आलेला होता. दुसच्या प्रकारच्या चित्रात एका आजारी माणसाला चार जण खांद्यावरून वाहून नेताना दाखविण्यात आलं होतं तर अन्य एका मोठा पण नसलेला फुगा रेखाटण्यात आला होता.

 ‘आता प्रत्येक गटाने आपल्यातल्या एका पुढारयाची निवड करावी आणि आपल्या चित्राची संकल्पना सर्वांना समजावून सांगावी' अशी सूचना मी केली.कामगार पुढारी हे चांगले वक्ते असतातच.त्यामुळे प्रत्येकान आपल्या गटाच्या चित्राची

कामगार नेते आणि मानवबळ विकास/ १८८